
| औरंगाबाद | आता 1500 स्क्वेअर फुटांपर्यंत घर बांधण्यासाठी परवानगीची गरज नाही, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबाद महापालिकेच्या अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नगरविकास विभागाच्या वतीने मोठा निर्णय घेतला गेला असून, 31 डिसेंबर 2020 पर्यंतची बांधकामे नियमित होतील, त्याचबरोबर 1500 स्क्वेअर फूट घर बांधायचे असेल तर महापालिकेची परवानगी घेण्याची गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
3 हजार स्क्वेअर फूट घरं बांधणाऱ्यांसाठी 10 दिवसांत परवानगी
राज्यातील 55 हजार कुटुंबांना गुंठेवारीचा फायदा होणार असून, 3 हजार स्क्वेअर फूट घरं बांधणाऱ्यांसाठी 10 दिवसांत परवानगी देणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं. थकीत वीजबिल असलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडणी केली जात असल्याने याबाबत मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांशी बोलणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय.
माहिती घेऊनच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर बोलणार
सध्या राज्यभरात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणीही त्यांनी भाष्य केलं. पूजा चव्हाण प्रकरण संवेदनशील असून, या विषयात मला जास्त माहिती नाही. माहिती घेऊनच या विषयावर बोलणार असून, सध्या बोलणं उचित नसल्याचंही त्यांनी सांगितलंय.
औरंगाबादचे संभाजीनगर करण्याला कुणाचाही विरोध असता कामा नये
औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करावे ही जनतेची भावना असून, आम्ही जनतेच्या भावनेसोबत आहोत. त्यामुळे औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण होणार आहे. निवडणूक आली की संभाजीनगर या नावाबाबत चर्चा होते असं विरोधक म्हणतात, मात्र निवडणुकीचा आणि संभाजीनगरचा काही संबंध नाही, असं सांगत संभाजीनगर नावाला कुणाचाही विरोध असता कामा नये, असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणे योग्य नाही
”झालेली घटना दुर्दैवी आहे, मात्र थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडणे योग्य नाही, या प्रकरणी माहिती घेतल्यानंतर बोलणे उचित राहील, थेट मंत्री संजय राठोड यांचं नाव घेणं योग्य नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.
- “आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.!
- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार
- वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..