| मुंबई | संरक्षण संशोधन आणि विकास संस्थ (DRDO) ने अॅप्रेंटिससाठी विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. आयटीआय पासून डिप्लोमा, पदवीपर्यंतच्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही.
या पदांवर होणार भरती :
ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी – ८० पदे
डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी – ३० पदे
आयटीईय अप्रेंटिस ट्रेनी – ४० पदे
एकूण पदांची संख्या – १५०
आवश्यक पात्रता :
विविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता अनिवार्य आहे. आयटीआय व्होकेशनल कोर्स करणाऱ्या उमेदवारांपासून इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री कोर्स करणाऱ्यांपर्यंत ही भरती निघाली आहे. याची विस्तृत माहिती पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून मिळेल.
सर्व पदांसाठी आवश्यक किमान वयोमर्यादा १८ वर्षे तर कमाल वयोमर्यादा २७ वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गांसाठी नियमानुसार सवलत देण्यात येईल.
कसा करायचा अर्ज?
डीआरडीओ भरतीसाठी अधिकृत संकेतस्थळामार्फत ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया ७ जानेवारी २०२१ पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २९ जानेवारी २०२१ आहे. अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.
https://rac.gov.in/index.php?lang=en&id=0
निवड प्रक्रिया :
या पदांवर भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. पात्रता परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार होऊन त्यानुसार नियुक्ती होईल. अर्जात भरलेली माहिती आणि पात्रता प्रमाणपत्रांच्या आधारे शॉर्टलिस्टिंग होईल