” पर कर्तव्य सर्वोपरी रखा..!” , खासदाराला मतदारसंघातील नागरिकाने लिहलेले व्हायरल पत्र..!

सध्या हे पत्र सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना त्यांच्या मतदारसंघांतील नागरिकाने लिहलेले हे पत्र असून खासदार करत असलेल्या कामाची जणू पावतीच असल्याचे बोलले जात आहे.

प्रति,
आदरणीय श्रीकांत शिदे
खासदार कल्याण लोकसभा.. !
Dr Shrikant Eknath Shinde saheb

डॉक्टर साहेब,

जय महाराष्ट्र,

काल आपण एक online बैठकीला होतात हे पाहून आनंद वाटला आणि काळजी देखील. आपण मागील १५-१६ दिवसापूर्वी दुसऱ्यांदा कोरोना बाधित झालात.! *भल्या कामाचा झेंडा* घेऊन निघालेला आपल्या सारखा कार्यतत्पर खासदार सारखाच आपल्या नागरिकांच्या संपर्कात असणार म्हणजे हा संपर्काचा धोका असतोच.. झाले तसेच आपण पुन्हा बाधित सापडलात, यावेळी थोडा त्रास देखील झाला. परंतु आता आपली तब्बेत ठीक होत आहे. लवकरच आपण यातून बाहेर पडाल.! आणि पुन्हा झपाट्याने कामाला लागाल, पण यावेळी थोडा आराम करावा. *नंतरच आपण आम्हासाठी काम सुरू करावे, ही मनापासून इच्छा आणि आपल्याला विनंती आहे. म्हणून हा लेखनाचा अट्टाहास..!*

मागील वेळी १ मार्च रोजी बाधित झालात, आणि १४-१५ दिवसात बरे होऊन तात्काळ कामाला सुरवात देखील केलीत. ठाणे दिवा पाचव्या मार्गिकेचे काम असेल, पाइपलाइन द्वारे गॅस पुरवठा संबंधाने कल्याण ग्रामीण मधील काम असेल नाहीतर कळवा खाडीवरील तिसऱ्या पुलाच्या संदर्भातील गर्डर लॉन्चिंग, नवीन कोपर उड्डाण पूल बांधकाम किवा २७ गावातील तहान भागविणारी अमृत योजना असेल, उल्हासनगर शहरातील धोकादायक व अनधिकृत इमारतींच्या बांधकामा संदर्भातील २००६च्या आदेशाची अंमलबजावणी होण्यासंदर्भात मंत्रालयातील बैठक असेल, शिळ – कल्याण रस्त्याचे काम असेल आदी *प्रत्यक्ष कामासंबंधीत थेट ग्राउंड झिरो वरून आपण कार्यरत होतात.

दरम्यानच्या काळात नवी दिल्लीतील संसद भवनात सुरू असणाऱ्या अधिवेशनात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील २०२१-२२ साठीच्या अनुदान मागणीकरिता आयोजित चर्चेमध्ये सहभाग घेत विविध मुद्द्यांसह केंद्रातील सरकार महाराष्ट्र राज्य सरकारशी दुजाभाव करत असल्याचे परखड मत सभागृहात मांडले. लसीकरण मोहिमेतील दुजाभाव, बँक कर्मचाऱ्यांना लसीकरण, The National Commission for Allied and Health Care Professionals, Bill 2021 या विधेयकावरील चर्चेमध्ये सहभाग घेत *त्या दरम्यानच्या काळात संसदेत महाराष्ट्राचा आवाज बुलंद ठेवलात…*

या सोबतच आपण आपल्या मतदारसंघातील प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोविड संबंधाने करावयाच्या उपाययोजना कार्यपद्धती साठी बैठका घेतल्या. विविध संस्था, नागरिक, शासकीय यंत्रणा आदींच्या भेटीगाठी तर सुरू होत्याच. *इतका दांडगा जनसंपर्क असल्याने पुन्हा बाधित होणेच होते आणि झालेही तसेच.. !

मला यावरून या प्रसिद्ध कवितेतील ओळी समर्पक वाटतात

” सह ली कितनी यातना, पर कर्तव्य सर्वोपरी रखा..!”

यावेळी मात्र अधिकची काळजी घ्या. कमीत कमी १५ दिवस संपूर्ण विश्रांती घ्या ही आग्रहाची विनंती..!

– श्री. प्राजक्त झावरे पाटील, कल्याण
२७ एप्रिल २०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *