भिगवन मध्ये कोरोना च्या लढाईत अग्रेसर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी..

| भिगवण | गतवर्षी सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग आता दुसरा टप्पा संपून गेला तरी थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. त्यामुळे पोलिस आणि आरोग्य कर्मचारी नेटाने आपलं काम पूर्ण करताना दिसत आहेत. मात्र हे काम करत असताना अनेक पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आणि अनेक अधिकारी, कर्मचारी कोरोनाला बळी पडले. या पार्श्वभूमीवर भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असणाऱ्या तक्रारवाडी उपकेंद्राच्या वतीने भिगवण पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मृदुला जगताप यांच्या माध्यमातून करण्यात आली. आरोग्य विभाग आणि हिंद महालॅब बारामती यांच्या सहकार्याने उपकेंद्रातील आरोग्य सेविकांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिस ठाण्यातील सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी, महिला पोलिस आणि होमगार्ड यांच्या रक्ताचे नमुने जमा केले. रक्त तपासणी मध्ये सी बी सी, डी. डायमर, बीएसएल, थायरॉइड,सी आर पी यांची तपासणी करण्यात आली.

या उपक्रमासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मृदुला जगताप यांच्यासह आरोग्य सहायक रेणुका जाधव, आरोग्यसेविका उषा यादव, आशा वर्कर सीमा मारकड, लॅब टेक्निशियन घनश्याम जाधव यांनी याकामी मोठे परिश्रम घेतले.तक्रारवाडी उपकेंद्राच्या केंद्राच्या माध्यमातून पार पडलेल्या या उपक्रमांमध्ये सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभागी होत आपली आरोग्य तपासणी करून घेतली.

या आरोग्य तपासणी मुळे नेहमीच कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनाही कुणीतरी संवेदनशीलपणे आपला विचार करत आहे याची जाणीव झाली. प्रत्येकाने कोरोनाच्या या लढाईमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावले पाहिजे असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी याप्रसंगी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *