भुसावळ शहरात डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची विद्यार्थ्यांसाठी होणार सुरू

| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |  रमन सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाऊंडेशन, गुजरात संचालित उषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटर, भुसावळ व विग्यान प्रसार, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ येथे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा तसेच विज्ञान आणि गणिताविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कॉन्सील ऑफ यंग सायंटिस्ट सेंटरची सुरूवात करण्यात येणार आहे.

देशाचे माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मरण दिवसानिमित्त नगरपालिका भुसावळच्या समोरील अचिव्हर अकॅडमी येथे 27 जुलै मंगळवारी दुपारी ४ वाजता सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ऑनलाईन व ऑफलाईन होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उषाबाई शंकर पाटील या असतील तर सेंटरचे उद्घाटन विग्यान प्रसार नवी दिल्लीचे शास्त्रज्ञ डॉ.अरविंद रानडे करतील यावेळी मुंबई येथील नॅशनल प्लॅनेटोरीअम रिसर्च सेटंरचे वैज्ञानिक डॉ. जे.जे. रावल, इस्त्रोचे वैज्ञानिक भरतभाई चनियारा, रमन सायन्स टेक्नॉलॉजी फाऊंडेशनचे चेअरमन डॉ.चंद्रमौली जोशी, भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदिप चिद्रवार, श्रीगणराया कन्स्ट्रक्शन विजय खाचणे, अचिव्हर अकॅडमी चे संचालक संतोषकुमार चौधरी उपस्थित राहणार आहे.

यावेळी विद्यार्थी गणित व विज्ञानातील विविध साहित्याच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करून दाखवतील. हा कार्यक्रम झूम ॲप व डॉ.एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सील ऑफ यंग सायंटिस्टच्या फेसबुकवरून प्रक्षेपीत करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *