| पंढरपूर | राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतुन आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेला शिव आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका लोकार्पण उपक्रम यापुढेही अखंडितपणे सुरू ठेवा अशा शुभेच्छा शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांनी आज दिल्या.
आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्या शुभहस्ते अत्याधुनिक ALS रुग्णवाहिकेची चावी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ औसेकर महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी सौ.रश्मी( ताई ) ठाकरे, युवा सेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण तथा पर्यटन मंत्री,0श्री आदित्यजी ठाकरे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्री विठ्ठल जोशी, समिती सदस्य मा श्री संभाजी राजे शिंदे आदी जण उपस्थित होते.
यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले की, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीला एक अत्याधुनिक रुग्णवाहिका देण्यात यावी अशी मागणी आम्ही डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडे केली होती. आज आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री मा ना श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या शुभहस्ते आमच्या ताब्यात ही रुग्णवाहिका मिळत असल्याचा विशेष आनंद होत आहे. सदर रुग्णवाहिका पंढरपूर परिसरातील गरजू रुग्णांना आधार ठरेल असा विश्वास श्री औसेकर महाराज यांनी व्यक्त केला. तर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्री विठ्ठल जोशी यांनी रुग्णवाहिका दिल्याबद्दल डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनचे सर्वेसर्वा आणि कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले.
यावेळी, खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी संयुक्तपणे संपादित केलेल्या वैद्यकीय मदत मार्गदर्शक या ग्रंथाच्या प्रती मुख्यमंत्री महोदय यांच्यासहित उपस्थित सर्व मान्यवरांना भेट देण्यात आल्या.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .