शाळाबाह्य मुलांच्या महत्वाकांक्षी शोधमोहिमेतून बालके आली शिक्षणाच्या प्रवाहात, डहाणूतील प्रगणक शिक्षकांचे प्रशंसनीय कार्य..!

| पालघर | राज्यभर शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरीत विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण चालू आहे. यामध्ये प्रगणक म्हणून सर्व शिक्षक आणि अंगणवाडी सेविका गाव, पाड्यातील घरोघरी भेट देऊन सर्वेक्षण करीत आहेत.

दरम्यान, दि. ०४ मार्च २०२१ रोजी मौजे मुरबाड पेंढारपाडा, ता. डहाणू येथील शिक्षक श्री. संजय हरी पिचड यांना सर्व्हेक्षणामध्ये शोभना मधु सोमण ही दिव्यांग मुलगी आढळून आली. त्यांनी केंद्रीय बालरक्षक श्री. शाहू संभाजी भारती यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली असता, त्यांनी गट साधन केंद्र डहाणू येथील विशेष शिक्षक नंदेश सोनवणे यांना सदरील माहिती दिली. लागलीच शिक्षक श्री. संजय हरी पिचड यांच्या समवेत विशेष शिक्षक नंदेश सोनवणे, बालरक्षक श्री. शाहू संभाजी भारती यांनी सदरील मुलीच्या घरी जाऊन मुलीचे आणि तिच्या पालकांचे समुपदेशन केले. त्यांनी चांगला प्रतिसाद देत मुलीला शाळेत पाठविण्याचे मान्य केले. सदर मुलीला नजीकची जिल्हा परिषद शाळा मुरबाड पागीपाडा येथे प्रमुख शिक्षिका श्रीम. संध्या भास्कर धानमेर यांनी दाखल करून घेतले आहे.

तसेच वांगर्जे चरीपाडा येथील सुनील सुरेश बेंडगा हा दिव्यांग मुलगा शाळाबाह्य आढळून आल्याने पालकांना उचित मार्गदर्शन करून त्याला तात्काळ जिल्हा परिषद शाळा वांगर्जे चरीपाडा येथे दाखल करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक चौधरी सर, विशेष तज्ञ मानसी मोहिते, विशेष शिक्षक नंदेश सोनवणे आणि बालरक्षक शाहू संभाजी भारती यांच्यासह वांगर्जे चरीपाडा शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा मुरबाड पागीपाडा येथील प्रमुख शिक्षिका श्रीम. संध्या भास्कर धानमेर ह्या भोयेपाडा येथे सर्वेक्षण करीत असताना त्यांना रमन वनश्या काटकर हा दिव्यांग मुलगा आढळून आला. पालकांच्या योग्य समुपदेशनानंतर त्याला जिल्हा परिषद शाळा मुरबाड पागीपाडा येथे दाखल करण्यात आले आहे. यावेळी विशेष शिक्षक नंदेश सोनवणे आणि बालरक्षक शाहू संभाजी भारती उपस्थित होते.

सदरील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरीत मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची महत्वाकांक्षी शोधमोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा स्तरावरून लता सानप ( शिक्षणाधिकारी प्राथ. तथा डायट प्राचार्या पालघर ), संगीता भागवत (शिक्षणाधिकारी माध्य. पालघर), श्री. भरक्षे ( डहाणू गट विकास अधिकारी ) श्री. राठोड ( सहाय्यक गट विकास अधिकारी तथा गट शिक्षणाधिकारी डहाणू ) श्री. संजय वाघ ( गट समन्वयक तथा ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी डहाणू ), श्री. विष्णू रावते ( ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी डहाणू ) यांच्यासह पालघर जिल्हा समता विभाग प्रमुख तानाजी डावरे, तालुका बालरक्षक समन्वयक श्रीम. बिंदिया राऊत, कासा केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश भोये आणि कोल्हाण केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. नंदकुमार लिलका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published.