महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे विश्वस्त कुणाल पवार यांना डॉक्टरेट..!

| जळगाव | अंमळनेर तालुक्यातील ढेकू खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कुणाल पवार यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे.

कुणाल पवार यांनी विद्यापीठाच्या विज्ञान शाळेतून Geography विषयात “Geomorphic Analysis of Gomai River For Watershed Management” या विषयात संशोधन पूर्ण केले आहे. त्यांना नुकतीच प्र. कुलगुरू डॉ. बी व्ही पवार यांच्याहस्ते पदवी प्रदान करण्यात आली. गाईड म्हणून त्यांना प्रा. डॉ. मोहन वैशंपायन यांचे मार्गदर्शन लाभले. ते एक उत्तम कवी, गझलकार व लेखक आहेत तसेच विविध शैक्षणिक, साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीत सतत कार्यरत असतात.

कुणाल पवार हे खान्देश साहित्य संघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष असून, जीवन गौरव मासिकाचे सहसंपादक ही आहेत. तसेच पेंशन संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष ही आहेत. त्यांना मिळालेल्या यशाबद्दल शिक्षणाधिकारी बी. एस. अकलाडे, अमळनेरचे गटशिक्षणाधिकारी आर. डी. महाजन, केंद्रप्रमुख शरद सोनवणे यांनी अभिनंदन केले. त्यांचे विविध सामाजिक, साहित्यिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *