या बँकेत बंपर भरती, करा असा अर्ज..!

| नवी दिल्ली | सरकारी बँकेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आता एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ बडोदा(Bank of Baroda) ने मॅनेजर पदासाठी बंपर भरती जारी केली आहे. यामध्ये (Bank Manager Recruitment 2021) एकूण 511 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. बँक मॅनेजर पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार बँक ऑफ बडोदाचे अधिकृत संकेतस्थळ bankofbaroda.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. याबाबत एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे.

अर्ज कसा करावा?

✓ सर्वप्रथम bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटवर जा.
✓ होम पेजवरील Career सेक्शनवर क्लिक करा.
✓ करिअर विभागात असलेल्या Recruitment Project सेक्शनवर क्लिक करा.
✓ यामध्ये “Recruitment for Wealth Management Services Department” या लिंकवर क्लिक करा.
✓ आता Link to Apply वर जा. पुढील पानावर Application form ओपन होईल.
✓ आवश्यक तपशील भरा आणि सबमिट करा. शेवटी निश्चित फी जमा करुन अर्जाची प्रक्रिया पूर्ण करू शकता.

कोण अर्ज करू शकेल?

विविध पदांसाठी भरती केली जाईल. यामध्ये सर्वाधिक भरती व्यवस्थापक पदासाठी आहे. मॅनेजरच्या सर्व पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवी पूर्ण केलेली असली पाहिजे. तसेच फक्त फायनान्स सर्व्हिसचा अनुभव असलेले उमेदवारच अर्ज करू शकतात. याशिवाय संबंधित क्षेत्रात दोन वर्षांचे मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असणे अनिवार्य आहे. उमेदवारांकडून एनआयएसएम / आयआरडीएकडे नियामक प्रमाणपत्र मागितले गेले आहे.

‘या’ पदांवर होईल भरती

भरतीमध्ये एकूण व्यवस्थापकांच्या 511 पदांवर भरती होईल.

✓ सिनिअर रिलेशनशिप मॅनेजर – 407 पद
✓ ई-वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर – 50 पद
✓ टेरीटरी हेड – 44 पद
✓ ग्रुप हेड – 6 पद
✓ प्रोडक्ट हेड (Investment & Research) – 1 पद
✓ हेड (Operation & Technology) – 1 पद
✓ डिजिटल सेल्स मॅनेजर – 1 पद
✓ आयटी फंक्शनल एनालिस्ट-मॅनेजर – 1 पद

एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *