रावसाहेब रोहोकले म्हणजे पारनेर तालुक्यातील संस्कारक्षम ध्येयवेडा सामाजकारणी – आमदार निलेश लंके

| पारनेर | रावसाहेब रोहोकले म्हणजे पारनेर तालुक्यातील ध्येयवेडे, संस्कारी, समाजकारणी. सातत्याने जिल्हाभर शिक्षकांच्या सुख दु:खात सहभागी होणारा असा हा ध्येयवेडा शिक्षक नेता सततच्या जनसंपर्कामुळे शिक्षकी राजकारणात नेहमीच चर्चेत राहिला आहे. या ठिकाणी उपस्थित शिक्षक वर्ग खरोखर भाग्यवान आहेत कारण अशा संस्कारी शिक्षक नेत्याच्या नेतृत्वाखाली आपण काम करत आहात असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुका शिक्षक परिषद व रोहोकले प्रणित गुरूमाऊली मंडळाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात बोलताना काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे आमदार डॉ. सुधीर तांबे हे होते.

यावेळी पुढे बोलताना लंके म्हणाले, राज्यशासन वेळेवर अनुदान देते तरीही शिक्षकांचे पगार उशीरा होतात. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याकरिता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब व जिल्हा परिषदेतील पगाराशी संबंधित अधिका-यांची लवकरच बैठक लावून सिएमपी प्रणालीच्या माध्यमातून हा प्रश्न निकाली काढण्याबाबत निश्चित प्रयत्न केले जातील. तसेच केंद्रप्रमुख पदे पदोन्नतीने भरण्याबाबत तसेच बदल्यामध्ये पती पत्नी बरोबरच एकल शिक्षकावरही अन्याय होणार नाही.बदल्यांबाबत सर्वसमावेशक धोरण घेऊन सर्वमान्य तोडगा काढण्याकरिता प्रयत्न करू असे सांगत लवकरच या प्रश्नावर ग्रामविकास मंत्र्याशी बैठक घडवून आणण्याकरिता मी स्वत: पुढाकार घेईल, असे सांगत शिक्षक परिषदेने आयोजित केलेल्या रक्तदाना सारख्या सामाजिक उपक्रमाचे लंके यांनी भरभरून कौतुक केले.

परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे, पोपट नवले, सचिन गाडीलकर या त्रिकुटाने सातत्याने सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून पारनेर तालुक्यात दिलेल्या योगदानामुळेच शिक्षक परिषद व गुरूमाऊली मंडळावर सर्वसामान्य शिक्षकांनी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून विश्वास व्यक्त केला आहे. शिक्षकांच्या प्रश्नासाठी माझ्याकडे कधीही या मी ते सोडवण्याकरिता निश्चित प्रयत्नशील राहिल असे आश्वासन यावेळी लंके यांनी दिले. यावेळी बोलताना डॉ.सुधीर तांबे म्हणाले, रावसाहेब रोहोकले यांच्याकडून शिक्षकांच्या प्रश्नाबाबत पाठपुरावा कसा करावा हे शिकण्यासारखे आहे. विधान परिषदेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांबाबत राज्यसरकारकडे मी सतत पाठपुरावा करत असतो. बदल्यांबाबत सर्वसमावेशक धोरण लागू करण्याकरिता आग्रही भूमिका घेऊ असे प्रतिपादन त्यांनी या वेळी बोलताना केले.

प्रास्ताविक प्रवीण ठुबे यांनी केले. राज्य संपर्क प्रमुख रावसाहेब रोहोकले, राज्य उपाध्यक्ष संजय शेळके यांनी शिक्षकांचे विविध प्रश्न या ठिकाणी मांडले. यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती काशिनाथ दाते, डॉ.बाबासाहेब बांडे, माजा सभापती सुदाम पवार, मिनाक्षी तांबे, अविनाश निंभोरे, राजू इनामदार, स्वाती झावरे, वैजिनाथ गिते,अल्ताफ शहा आदींनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमास पुण्याच्या रोटेरियन अर्चना गोजमगुंडे , गुरूमाऊली चे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे, आर पी रहाणे, संजय शिंदे, विभागीय अध्यक्ष राजेंद्र जायभाय, बाबा पवार, केंद्र प्रमुख संघटनेचे अशोक ढगे, विकास मंडळाचे अध्यक्ष भाऊ ढोकरे, उपाध्यक्ष गोरख देशमुख,खजिनदार संजय उदार, श्रीकृष्ण खेडकर, राम निकम, दत्ता गमे, खंडेराव उदे, रवि कांबळे, मच्छिंद्र कोल्हे, शिक्षक बँकेचे माजी व्हा.चेअरमन दिलीपराव औताडे, सिमा निकम, नाना बडाख, शिक्षक बँक संचालक राजू मुंगसे, अविनाश निंभोरे, संतोष अकोलकर, मंजूषा पवार, बबनराव भालेराव, बाळासाहेब रोहोकले, सुभाष गरूड , छाया त्र्यंबके, दिपक कारंजकर, बाळासाहेब मगर, संतोष खोमणे, रघुनाथ खामकर, ज्ञानदेव ठोकळ, शंकर गाडेकर, राजेंद्र थोरात, गाडेकर, कल्याण पोटभरे, राजाभाऊ पालवे, बाबा गोसावी, दिलीप दहीफळे, अनिता काळे आदिंसह जिल्हाभरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

रोटरी क्लब पुणे,नोबेल हॉस्पिटल पुणे व शिक्षक परिषद आयोजित रक्तदान शिबिरात उपस्थित मोठ्या संख्येने शिक्षकांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पोटे व ज्ञानेश्वर इंगळे यांनी केले तर आभार सुनिल दुधाडे यांनी मानले.

” केवळ पारनेर तालुकाच नाही तर संपुर्ण अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकांचा विश्वास निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या रावसाहेबरोहकले गुरुजीं यांच्यावरच आहे हे पुन्हा आजच्या मेळाव्याने दाखवून दिले आहे. “

प्रविण ठुबे, जिल्हाध्यक्ष शिक्षक परिषद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *