शिवराज्याभिषेक दिनानिमित्त डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशन कडून किल्ले रायगडवर नेत्रदीपक रोषणाई..

ठळक मुद्दे :

✓ किल्ले रायगडवर नेत्रदीपक रोषणाईची दखल घेऊन खासदार डॉ.श्रीकांत शिंदेना युवराज छत्रपती श्री संभाजीराजे यांचे कडून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार.

✓ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने रायगडावर दररोज अर्पण होत आहेत 5 पुष्पहार

| किल्ले रायगड | शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर कल्याणचे लोकसभा खासदार यांच्या डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या वतीने नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली आहे. मेघडंबरी आणि होळीचा माळ येथील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळा ठिकाणी, जगदीश्वर मंदीर, समाधीस्थळ, आणि शिकराई देवी मंदीर, राजसदर सहित रायगडवरील विविध वास्तू नेत्रदीपक रोषणाईने उजळून निघाल्या आहेत.

मागील शिवजयंती उत्सवात देखील डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन कडून नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती. त्याच धर्तीवर याहीवेळी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावरील वास्तू नेत्रदीपक रोषणाईने करण्यात आली आहे. याची दखल घेऊन खासदार डॉ.श्रीकांत शिंदेना युवराज छत्रपती श्री संभाजीराजे यांचे कडून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून किल्ले रायगडवर दररोज 5 पुष्पहार अर्पण होत आहेत.

छत्रपती शिवरायांची राजधानी किल्ले रायगडवरील राजसदर व होळीचा माळ येथील शिवरायांचा पुतळा, शिरकाई देवी मंदीर, जगदीश्वर मंदीर, आणि समाधी स्थळाला रोज 5 पुष्पहार अर्पण करण्याचा संकल्प खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवजयंती पासून सुरू केला आहे. त्यानुसार दररोज पुष्पहार अर्पण करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *