स्वराज लोकरे ची विक्रमी कामगिरी; इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मधे झाली विक्रमाची नोंद..

| पालघर | 55 देशांच्या राष्ट्रीय प्राण्यांची नावे अवघ्या एक मिनिटात सांगून स्वराज व्यंकट लोकरे याने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मधे झाली असून या विक्रमाबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मार्फत मेडल व सर्टिफिकेट देऊन स्वराज ला सन्मानित करण्यात आले आहे.

स्वराज, चिन्मय विद्यालय तारापूर येथे इयत्ता चौथी मधे शिकत असून यापूर्वीही नॅशनल सायन्स आॅलिंपीयाड परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर 28 वी रॅंक मिळवून यश संपादन केले तर एम. टी. एस. आॅलिंपीयाड परीक्षेत 300 पैकी 290 गुण घेऊन सिल्वर मेडल मिळवले आहे. या विक्रमी कामगिरी बद्दल सर्वत्र स्वराज वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.