
| डोंबिवली | रिव्हरवूड पार्क (खिडकाळी) येथील सीताबाई के.शहा मेमोरियल शाळेबाहेर पालकांनी शाळा व्यवस्थापनाच्या मनमानी कारभार विरोधात प्रतीकात्मक शाळा सुरु आंदोलन केले. विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायवर पालकांनी उचलेले हे पाउल सरकारचे लक्ष वेधून घेणारे ठरले. या आंदोलनात दोन खाजगी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन शिक्षण देत पाठिबा दिला आहे. न्याय मिळणार नाही तोपर्यत असे अनोखे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे पालकवर्गानी पत्रकारांना सांगितले.
सीताबाई या शाळेचे संस्थापक अध्यक्ष भरत शहा यांनी सदर शाळा इ. १ ते इ. ७ वी पर्यंत स्टेट बोर्ड अभ्यासक्रम असणारी शाळा १३ वर्षा पूर्वी सुरु केली होती. या शाळेत आसपासच्या गावातील विद्यार्थी प्रवेश घेऊन शिकत आहेत. तसेच या शाळेने अचानकपणे सदर शाळा संचालकांनी बेकायदेशीररित्या स्टेट बोर्ड अभ्यासक्रम बंद करून सीबीएसई शाळा सुरु करण्याची हालचाल सुरु केली व सदर शाळेतील सर्व पालकांना सीबीएसई बोर्डाची वार्षिक फि ७०,००० रुपये केली. ७०,००० रु.फी देण्यास पालकांनी नकार दिला सीबीएसई ऐवजी स्टेट बोर्डच हवा. अशी मागणी केली. १४ जून रोजी शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत .परंतु सीताबाई के. शहा शाळा संचालक भरत शहा यांनी सदर शाळा सुरु केली नाही. त्यामुळे सीताबाई के. शहा शाळेतील ४५० विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.
शिक्षण विभागाचे सर्व आदेश धुडकावून शाळेचे अध्यक्ष भरत शहा यांनी शाळा बंद केली असल्याचा आरोप पालकवर्गानी केला. गेल्या सहा महिन्यापासून खासदारांसह आमदार प्रमोद ( राजू ) पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, नगरसेवक बाबाजी पाटील, व.पो.नी डायघर पोलीस स्टेशन यांच्या बरोबर अनेक बैठका घेऊन शाळा सुरु करणेबाबत चर्चा करण्यात आली परंतु शाळेचे अध्यक्ष भरत शहा हे कुणालाही जुमानत नाही व दाद देत नसल्याचा आरोपही होत आहे. म्हणून पालकांनी आंदोलन केले आहे. सदर आंदोलनाचे नेतृत्व अँड. रामदास वायंगडे, काँम्रेड काळू कोमास्कर, नगरसेवक बाबाजी पाटील, पालक- शाखाप्रमुख दिपेश पाटील, उत्तम पवार, राम म्हात्रे, संजय पाटील, सत्तेवान पाटील, रुपेश पाटील, नवनाथ पाटील, अवधूत घाडगे, भूषण कोकाटे, नवनाथ ठाकूर, नवनाथ पवार, मिलिंद पाटील, इत्यादी मान्यवर करीत आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री