आधी वडापाव खाता, मग ‘नेता’; खासदार लोखंडेंनी अन्सार चाचांनाच ऐकवला ‘खाता की नेता’ डायलॉग …………. “आमच्याकडे जे वडे खाता, ते 100 टक्के निवडूनच येता”

आशिष कुडके :- अहमदनगर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार जोमाने प्रचाराला लागले आहेत.त्या अनुशंघाने मंगळवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे संगमनेर तालुका दौऱ्यावर होते. आपल्या विशिष्ट शैलीने ग्राहकांशी बोलण्यासाठी आणि अतिशय चविष्ट वडापावसाठी जिल्ह्यासह राज्यभरात प्रसिद्ध असलेले समनापुर येथील अन्सार चाचा यांच्या नसिब वडापाव येथे आवर्जून लोखंडेंनी भेट दिली.

खासदारांचा ताफा अचानक अन्सार चाचांच्या दुकानासमोर थांबताच अन्सार चाचांनी देखील दुकानातून बाहेर येत खा. लोखंडे यांचे स्वागत केले.

खा. लोखंडे यांनी अन्सार चाचांचा हात हातात घेत त्यांचा फेमस डायलॉग ..”खाता की नेता” म्हणताच उपस्थितांसह अन्सार चाचा देखील खळखळून हसले. आणि उत्तरात म्हणाले… “पहिली खाता अन् मग नेता” नेत्या समोर खाता आणि नेता असे यमक योगायोगाने जुळल्याने अन्सार चाचांना हसू आवरले नाही.

आपल्या यंत्रणेला प्रचंड वेग धारण करत वडापाव देण्याचा आदेश दिला आणि त्यानंतर स्वतः हाताने खासदारांना वडापाव देखील खाऊ घातला. विजयासाठी खासदार लोखंडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *