आता रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षा, टॅक्सी आणि बसेसच्या रांगेत उभी राहण्याची गरज नाही, आता मिळतील इलेक्ट्रिक बाईक..!

| मुंबई | मध्य रेल्वेने मुंबईपर्यंतचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एक खास सेवा लवकरच सुरू होत आहे. मध्य रेल्वेने मुंबईपर्यंतचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक चांगली बातमी आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एक खास सेवा लवकरच सुरू होत आहे. नवी मुंबई पालिका, मुंबई मेट्रो वन आणि एमएमआरडीएच्या धर्तीवर आता मध्य रेल्वेही इलेक्ट्रिक बाईक भाडय़ाने उपलब्ध करणार आहे.

मध्य आणि हार्बर मार्गाला जोडणाऱ्या सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपेकी एक असलेल्या महत्वाच्या स्थानकात ही सुविधा फेब्रुवारी अर्थात या महिन्यातच उपलब्ध होणार असल्याने प्रवाशांना रिक्षा, टॅक्सी आणि बसेसच्या रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. बीकेसीमध्ये ‘युलु ई-बाईक’ सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने मध्य रेल्वेनेदेखील ही सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध केली आहे.

मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकात प्रवाशांना मोबाईल अ‍ॅपवर चालणाऱ्या भाडेतत्त्वावरील ‘युलु ई-बाईक’ फेब्रुवारी अर्थात या महिन्यामध्येच उपलब्ध होणार आहेत. ही सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, घाटकोपर, ठाणे, मुलुंड आणि भांडूप या स्थानकांवरही लवकरच सुरू करण्याची मध्य रेल्वेची तयारी सुरू आहे.

कुर्ला स्थानकाच्या पश्चिम बाजूला महिनाभरात 80 ई-बाईक बीकेसी तसेच आजूबाजूच्या परिसरात जाण्यासाठी उपलब्ध असणार असून त्यासंबंधित टेंडरचे वाटपही मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनने केले आहे. एकूण 80 इलेक्ट्रिक बाईक प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहेत. या मोबाईल अ‍ॅप आधारित बाईक कुर्ला पश्चिम येथून बीकेसी तसेच अन्य नजीकच्या ठिकाणी जाण्यासाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत.

कुर्ला स्टेशन परिसरात या ई-बाईक्स ठेवण्यात येणार आहेत. या बाईक्स लॉक असतील. त्या अनलॉक करण्यासाठी युलू अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर बाईक अनलॉक करण्यासाठी बाईकवरचा QR कोड स्कॅन करुन अवघे पाच रुपये द्यावे लागतील. नंतर प्रत्येक एका मिनिटासाठी १.५ रुपये म्हणजेच साधारण १० मिनिटांसाठी तुम्हाला फक्त १० ते १५ रुपये या हिशेबाने बाईक वापरण्याचं भाडं आकारलं जाईल.

या ई-बाईकचा अजून एक फायदा म्हणजे तुमच्याकडे लायसन्स असण्याची गरज नाही. ई-बाइक स्थानकावरून घेताना उपलब्ध बॅटरीनुसार किती किमी अंतर कापले जाऊ शकते याची माहितीही अ‍ॅपवर उपलब्ध असेल. बॅटरी पूर्ण चार्ज असताना ५५ किमी अंतर कापेल. या सेवेमुळे ट्रॅफिक आणि प्रदूषणाला चांगलाच आळा बसेल. बाईक वापरून झाल्यावर ती पुन्हा जवळच्या स्टेशनवर लॉक केली की काम संपलं. युलु अ‍ॅपवर आजूबाजूच्या परिसरात ई-बाईक स्टेशन्स कुठे आहेत हे दाखवणारा नकाशा उपलब्ध असेल.

Leave a Reply

Your email address will not be published.