” आता तिहार जेलचे देखील नामकरण पंतप्रधानाच्या नावावरून करून टाकावे “

| मुंबई | जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं आहे. स्टेडियमचं नामकरणं नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद असं करण्यात आलं आहे. याच मैदानावर आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना प्रकाशझोतात रंगणार आहे.

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना आजपासून खेळला जाणार आहे. प्रकाशझोतात होणाऱ्या पिंक बॉल क्रिकेट सामन्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, सामना खेळवण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं.

या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते.

दरम्यान, सरदार वल्लभभाई पटेल यांच्य नावाला बगल देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाला प्राथमिकता दिल्याने भाजपवर समाज माध्यमांवर जोरदार टीका होताना दिसत आहे. याच विषयाला अनुसरून स्टॅन्डउप कॉमेडियन कुणाल कामराने एक खोचक ट्विट केलं आहे. त्याने ट्विट करताना म्हटलं आहे की, “In all honesty Tihar Jail should be renamed after the Prime Minister
😂😂😂”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *