ॲड.धनश्री राजाभाऊ खटके यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड

| सोलापूर / महेश देशमुख | तांबवे टें ता. माढा येथील अ‍ॅड.धनश्री राजाभाऊ खटके यांची सोलापूर जिल्हा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली.

सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांच्या हस्ते निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले. त्या तांबवे टें गावचे माजी सरपंच राजाभाऊ खटके यांच्या सुविद्य पत्नी आहेत. यावेळी भारतीय जनता पार्टीचे माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, गोविंद कुलकर्णी, रत्नाकर कुलकर्णी, जिल्हा सचिव अमरसिंह शेंडे, जिल्हा कोषाध्यक्ष चंदूकाका पाटील, सुहास शहा, सुरज ढवळे पाटील, सुरेश पाटील, सुरेश अंभोरे, औंदुबर भागवत, भाऊसाहेब महाडिक, गिरीश ताबे,बाळासाहेब ढगे, विष्णू बिचकुले, उमेश पाटील, भारत साळुंखे, विजय कोकाटे, भाऊसाहेब इंदलकर, सुधीर गाडेकर, मदन मुंगळे आदी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

निवडीनंतर बोलताना अ‍ॅड.धनश्री खटके यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची ध्येय धोरणे, केंद्राच्या विविध योजना महिलांपर्यत पोहोचवून जिल्ह्यात भाजपा वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *