आढावा बैठकीत गटविकास अधिकाऱ्यांना धरले धारेवर; भिगवणला होणार संस्थात्मक विलगिकरणाची सुविधा..

| भिगवण/महादेव बंडगर | भिगवण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीत इंदापूर पंचायत समिती उपसभापती,सरपंच,उपसरपंच,सदस्य यांनी इंदापूर चे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांना चांगलेच धारेवर धरले. कोरोना बाबतच्या अडचणी व प्रश्नांची सरबत्ती करत सर्व समस्या त्यांना सांगितल्या.व तात्काळ उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या.

सुरुवातीला गटविकास अधिकारी कोणाचेही एकूण घेण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हते.मात्र बैठकीतील सदस्यांनी बोलायला सुरुवात करताच ,तेही संतापले आणि मोठ्या आवाजात बोलू लागले. याबाबत ग्रा.पं सदस्य तुषार क्षीरसागर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना फोन करून याबाबत सर्व माहिती दिली आहे.

संस्थात्मक विलगिकरण साठी ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून उपविभागीय अधिकारी बारामती यांचे आदेशान्वये येथील तारादेवी लॉन्स , श्याम गार्डन व आदर्श विद्या मंदिर येथे संस्थात्मक विलगीकरणाची सोय होणार आहे. त्यामध्ये चाचणी साठी आलेल्या व्यक्ती आणि पॉझिटिव्ह रुग्ण असे विभाग करण्यात येणार आहेत. चाचणी साठी आलेले रुग्ण रिपोर्ट येईपर्यंत विलागिकरणात ठेवले जाणार आहेत. तसेच पॉझिटिव्ह असलेले परंतु कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेले रुग्णही येथेच राहणार आहेत. विलगिकरणासाठी जागा उपलब्ध करून देणारे प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक शेखर पवार यांचे विजयकुमार परीट यांनी अभिनंदन करून आभार मानले.

यावेळी संस्थात्मक विलगिकरणा च्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे जीवन माने यांनी सांगितले.

या बैठकीसाठी गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, सहा. पोलिस निरीक्षक जीवन माने, सरपंच तानाजी वायसे, उपसरपंच प्रतिनिधी पिंटू शिंदे, उपसभापती संजय देहाडे, मा. सरपंच पराग जाधव, तुषार क्षीरसागर, जयदीप जाधव,दत्ता धवडे, जावेद शेख, हरिभाऊ पांढरे, कपिल भाकरे, सचिन बोगावत, सत्यवान भोसले, तुकाराम काळे, ग्रामविकास अधिकारी डी.बी.परदेशी, तलाठी धनंजय गाडेकर, केंद्रप्रमुख नानासाहेब दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *