जादूच्या प्रयोगाने आदर्श गाव हिवरे बाजारात स्त्री जन्माचे स्वागत…

| पारनेर | पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील जादुगार प्रकाश शिरोळे व त्यांची सात वर्षाची मुलगी कु. जादु मुलीच्या जन्मानंतर तिच्या पाचवीला, बारवीला मोफत जादु च्या प्रयोगाचे कार्यक्रम घेऊन ‘स्त्री जन्माचे स्वागत करा असा संदेश देतात.

नुकतेच पद्मश्री पोपटराव पवार यांची मुलगी सौ प्राजक्ता श्रेयस दरे यांनी राजसी या गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. दरे परिवारामध्ये नुकतेच पहिले कन्यारत्न जन्माला आले व पद्मश्री पोपटराव पवार हे आजोबा झाला याचा आनंद संपूर्ण हिवरेबाजार परिवाराला, पवार कुटुंबियांना तसेच दरे कुटुंबियांना झाला. पहिले कन्यारत्न जन्माला आले म्हणुन मोठ्या उत्साहाने स्वागत हिवरेबाजार परिवाराने केले. याचेच औचित्य साधत मुलीच्या माहेरी हिवरे बाजार येथील पद्मश्री पोपटराव पवार यांच्या घरी बारीनिमित्त एक छोटासा कार्यक्रम घेण्यात आला. दरे आणि पवार कुटुंबियांनी सामाजिकता जपत समाजासाठी काही देणे लागतो. या हेतूने अळकुटी येथील जादूगार प्रकाश शिरोळे व त्यांची सात वषाची छोटी मुलगी कु. जादु शिरोळे यांच्या जादुच्या प्रयोगांचा कार्यक्रम ठेवला. कु.जादूने यावेळी समाजप्रबोधन केले. लेक वाचवा, बेटी धनाची पेटी, स्त्री जन्माचे स्वागत स्वगतांच्या आधारे आपल्या कलेच्या माध्यमातून शिरोळे यांनी उपस्थितांमध्ये जनजागृती केली .

यावेळी स्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्योत्स्ना डवले यांनी स्त्री समस्या व उपाययोजना याविषयी मागदर्शन केले. पद्मश्री पोपटराव पवार यांनी स्री जन्माचे स्वागत उत्साहाने करा असा कृतीतून संदेशच समाजासमोर या कार्यक्रमाद्वारे ठेवला. या कार्यक्रमासाठी डॉ. ज्योत्स्ना डवले, डॉ. पोपट कर्डीले, डॉ. रुपाली कर्डीले , हिवरेबाजार मधील नवनिर्वाचीत सरपंच सौ. विमल ठाणगे तसेच सर्व हिवरेबाजार परिवार, दरे कुटुंब उपस्थित होते. या कार्यक्रमचे नियोजन प्रसन्न पवार डॉ. योगेश पवार, आशिष पवार व सर्व पवार कुटुंब यांनी केले . तर जादू च्या प्रयोगाच्या नियोजनाची जबाबदारी प्रयास फौंडेशनचे प्रमोद झावरे सर यांच्याकडे होती. सदरील उपक्रमाचे हिवरेबाजार परिवारामध्ये जोरदार स्वागत केले गेले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *