| कल्याण | कल्याण पूर्वेच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लोकग्रामचा पादचारी पुलाच्या कामाला गती आली असून सदर पूल हा कल्याण रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी जिव्हाळ्याचा विषय बनला होता. हा पूल धोकादायक झाल्याने तो पादचाऱ्यांच्या रहदारीसाठी काही कालावधीपासून बंद ठेवण्यात आला होता. कल्याण लोकग्राम पादचारी पूल कधी सेवेत येणार असा प्रश्न देखील प्रवाशांकडून उपस्थित केला जात होता. आता प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असून पादचारी पुलाच्या पाडकामास आज पासून सुरुवात झालेली आहे.
या पूलाचे काम लवकर मार्गी लागावे यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यासंदर्भात रेल्वे प्रशासनासोबत अनेक वेळेस बैठका घेऊन सदर पुलाचे काम युद्ध पातळीवर होण्यासाठी स्वतः जातीने लक्ष देत असल्याचे हि आपल्याला दिसते. तसेच सदर पुलासाठी लागणारे प्राकलन रक्कम ७८ कोटींची आवश्यकता होती परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नव्हते; व सदर पूलासाठी कल्याण स्मार्ट सिटी प्रकल्पांअंतर्गत निधीची उपलब्धता होणेस खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे नेहमीच आग्रही होते, त्यासाठी स्वतः पाठपुरावा करून शासनाकडून क.डों.म. पालिकेस निधी उपलब्ध करून देऊन, रेल्वे प्रशासनाकडे वर्ग करण्याकरिता खासदार डॉ. शिंदे यांना यश प्राप्त झाले.
तद्नंतर रेल्वेने जुन्या लोकग्राम पादचारी पुलाच्या पाडकाम करण्याची निविदा प्रसिद्ध केली होती; त्यास अखेर सुरुवात झाली असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी माहिती दिली. दि. ०५ मार्च रोजी लोकग्राम येथील पादचारी पुलाच्या पाडकामाला सुरुवात झाली असून जून शेवटपर्यंत पाडकाम पूर्णत्वास; व लगेचच नवीन पुलाच्या बांधकामास सुरुवार होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच सदर पुलाचे पाडकाम व नवीन पुलाचे काम हैदराबादमधील खाजगी कंपनीला मिळाले असून त्यांनी मुंबई मधील नावेद या कंपनीला करार पद्धतीने (Sub-Contract) काम करण्याचे सोपविले असल्याचे समजते.
त्याचबरोबर पाडकाम संपण्याच्या आत पादचारी पूलाच्या बांधकामाची निविदा देखील रेल्वेकडून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार; त्यामुळे पाडकाम संपताच नव्या पादचारी पुलाच्या बांधकामाची निविदाप्रक्रिया पुढील महिन्यात पूर्ण करून लगेच नवीन पुलाच्या बांधकामास सुरुवात करण्यात कोणताही अडथला व विलंब होणार नाही असे देखील खा.डॉ. शिंदे यांनी सांगितले आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .