आनंदमुर्ती कन्सल्टंट मुळे बांधकाम क्षेत्रात माढा तालुक्यात चांगली सेवा उपलब्ध होईल – आ. बबनराव शिंदे

| सोलापूर / महेश देशमुख | आर्किटेक्चर, आर. सी. सी, थ्रीडी, इंटिरिअर, प्लॉटिंग लेआऊट, व्हॅल्युएशन आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील चांगल्या सेवेसाठी माढा तालुक्यातील नागरिकांना आतापर्यंत पुण्यात जावे लागत होते पण मिटकल परिवाराने सुरू केलेल्या आनंदमुर्ती कन्सल्टंट अ‍ॅण्ड डेव्हलपर्स या फर्म मुळे आता ही सेवा आपल्या टेंभुर्णीत उपलब्ध होईल, तालुक्यातील नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव शिंदे यांनी आनंदमुर्ती कन्सल्टंट अ‍ॅण्ड डेव्हलपर्सच्या उद्घाटनप्रसंगी केले.

इंजिनिअर आनंद रामभाऊ मिटकल व ओंकार रामभाऊ मिटकल यांच्या आनंदमुर्ती कन्सल्टंट अ‍ॅण्ड डेव्हलपर्सचे नुकतेच आ. बबनराव शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना आ. बबनराव शिंदे म्हणाले की, तालुक्यातील शेती, औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीमुळे टेंभुर्णीचा विकास मोठ्या गतीने होत असून या ठिकाणी रहिवासी क्षेत्र वाढत असताना बांधकाम क्षेत्रातील गरजा लक्षात घेऊन आनंदमुर्ती कन्सल्टंट अ‍ॅण्ड डेव्हलपर्स मुळे या क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रकल्प उभे राहतील.

यावेळी पंचायत समितीचे सभापती विक्रम दादा शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, माजी उपसभापती तुकाराम ऊर्फ बंडूनाना ढवळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप,शिवसेनेचे तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण, सुधीर महाडिक, विजयकुमार कोठारी, दिलीप भोसले, रमेश पाटील, भिमराव भरगंडे, इंजिनिअर तुकाराम राऊत, रविंद्र श्रीखंडे, मोहन लोकरे, बी.के.गायकवाड, किशोर सलगर, सचिन होदाडे, संदीपान बागल, डॉ. नवनाथ शेळके, नवनाथ सुरवसे, अशोक मिस्किन, हनुमंत चव्हाण, सतिश काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितीतांचे स्वागत व आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ मिटकल यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *