अरविंद सावंत यांच्या विरोधात नवनीत राणा यांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार..! हे आहे पत्रात..!

| नवी दिल्ली | राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मनसुख हिरेन हत्याकांड आणि सचिन वाझे प्रकरणात लोकसभेत महाराष्ट्रातील ठाकरे सरकार विरुद्ध आवाज उठविणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी संसदेच्या आवारात धमकी दिल्याचा आरोप केला आहे.

सचिन वाझे प्रकरणात आज शुन्य प्रहारपूर्वी १२ वाजून १४ मिनिटांवर अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनित रवि राणा यांनी राज्यातील उद्धव ठाकरे सरकारला बरखास्त करण्याची मागणी केली. तसेच सचिन वाझे याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद असल्याचाही गंभीर आरोप होता. यानंतर संसदेच्या लॉबीमध्ये शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी मला लॉबीमध्ये धमकी दिली असे पत्र नवनित राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले आहे.

मी ठाकरे सरकार विरुद्ध आवाज उठवला त्यानंतर अरविंद सावंत यांनी लॉबीमध्ये मला धमकी दिली. महाराष्ट्रात तू कशी फिरते, मी पाहतो, तुलाही जेलमध्ये टाकतो अशी धमकी दिली. यापूर्वी शिवसेनेच्या लेटर हेडवर माझ्या चेहऱ्यावर अॅसीड टाकण्याची धमकी दिली होती. आज पुन्हा अरविंद सावंत यांनी मला धमकी दिली आहे. हा माझा नाही तर देशातील सर्व महिलांचा अपमान आहे. त्यामुळे अरविंद सावंत यांच्यावर कठोरातील कठोर पोलीस कारवाई केली पाहिजे, अशी मी मागणी करत आहे, असे या पत्रात नवनित राणा यांनी नमूद केले आहे.

नवनीत राणा यांनी या पत्राची एक पत्र पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, संसदीय कार्यमंत्री, दिल्ली पोलीस आयुक्त यांनाही पाठवली आहे.

वाचा पत्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *