महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने
नवे संकल्प करूया – अविनाश दौंड

| मुंबई | महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना जगाला हेवा वाटेल असा पुरोगामी महाराष्ट्र घडविणारे थोर समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०५ हुतात्मे आणि जगभरातील लक्षावधी कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शाहिद झालेले कामगार कार्यकर्ते, कामगार नेते यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन करून बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी या दिवसापासून काही महत्त्वपूर्ण संकल्प करण्याचे आवाहन कर्मचा-यांना केले आहे.

करोनाच्या या दुसऱ्या लाटेत देशस्थिती अतिशय भयावह झाली असून देशात आरोग्य आणिबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात रोज ६५ ते ७० हजार नवीन रुग्ण आढळत असून दुर्दैवाने रोज ५०० नागरिक बळी पडत आहेत. मुंबईत तर उद्रेक झाला असुन रुग्णालयात बेड, आॅक्सिजन, इंजेक्शन,लस यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या १६ महिन्यात करोनाशी लढताना हजारो शासकीय कर्मचारी, प्रामुख्याने आरोग्य सेवक, पोलिस, वाहक, चालक यांना जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या वारसांना तातडीने ५० लक्ष विमा रक्कम आणि अनुकंपा तत्वावर नोकरी देणे हे शासनाचे कर्तव्य आहे.

कर्मचाऱ्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या शासन दरबारी बराच काळ प्रलंबित आहेत आणि पुढील काळात त्यासाठी संघर्षसुद्धा करावा लागणार आहे असे अविनाश दौंड यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त ज्येष्ठ स्वर्गीय नेते मा कर्णिक यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आजच्या कठीण काळात कर्मचाऱ्यांनी शासनाला तन, मन आणि धनाने सहकार्य केले पाहिजे. साधन सामुग्रीचा तुटवडा असला तरी रुग्ण सेवा हिच ईश्वरसेवा समजून सर्वोत्तम सेवा द्यावी. यापुढे समाज माध्यमांवर व्यक्त होताना आचार संहितेचे काटेकोर पालन करावे. संपुर्ण जिल्ह्यात एकमेकांशी कायम संपर्कात राहून अभावग्रस्तांना सर्वतोपरी मदत करावी.याकामी राहत्या ठिकाणी सुद्धा पुढाकार घ्यावा. तसेच अनेक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना करोना होऊन ते बरे झाले आहेत.अशांनी लस घेण्यापूर्वी प्लाझ्मा द्यावा असे संकल्प करावेत असे आवाहन दौंड यांनी केले आहे.

व्हिडिओ लिंक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *