सेवापूर्ती निमित्ताने अविनाश दौंड यांचा पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांचे हस्ते ह्रदय सत्कार..!

| मुंबई | शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय लिपिक वर्ग संघटनेने सल्लागार, बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस, महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रेसेस एम्प्लॉइज फेडरेशनचे कार्याध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सचिव आणि अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे कार्यकारिणी सदस्य अविनाश दौंड हे नुकतेच ३६ वर्षे शासकीय सेवा प्रामाणिकपणे बजावून पर्यवेक्षीय पदावरून निवृत्त झाले. काल दिनांक २ सप्टेंबर रोजी शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय लिपिक वर्ग संघटनेने आयोजित केलेल्या कार्यगौरव समारंभात पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांच्या हस्ते अविनाश दौंड यांना मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात सीटू कामगार संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.डी एल. कराड यांनी दौंड यांचा कामगार चळवळीतील मोठा अनुभव पाहता त्यांनी फक्त सरकारी कर्मचारी संघटनेचे काम न करता यापुढे सर्व श्रमिक वर्गासाठी काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांनी अविनाश दौंड यांची सरकारी कर्मचारी चळवळीला नितांत गरज असुन यापुढेही त्यांनी सातत्यपूर्ण काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी दौंड हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असुन राज्य कामगार कल्याण मंडळाच्या अनेक कार्यक्रम आणि उपक्रमात त्यांचा सातत्याने सहभाग होता. यापुढेही त्यांनी मंडळाला मार्गदर्शन करावे अशी सूचना केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष शासन मुद्रण व लेखन सामग्री संचालनालयाचे संचालक रुपेंद्र मोरे यांनी दौंड यांनी ३६ वर्षे प्रामाणिकपणे शासकीय सेवा बजावून पर्यवेक्षीय पदावरून ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी ३० वर्षे स्थानिक, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आणि आता राष्ट्रीय स्तरावरील संघटनांमध्ये अतिशय जबाबदारीने काम केले आहे. या कालावधीत त्यांनी नेहमीच कामगारांचे प्रश्न कुशलतेने मांडून त्यांना न्याय मिळवून दिला आहे.यापुढे सुद्धा त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आम्ही करुन घेवु असे प्रतिपादन केले.

या प्रसंगी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विश्वास काटकर यांनी दौंड यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोकराव दगडे यांनी दौंड यांच्या वक्तृत्व आणि कर्तृत्वाची प्रशंसा केली. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक सल्लागार ग.दि. कुलथे यांनी सत्कारमूर्तीच्या सातत्यपूर्ण भरीव कार्याची स्तुती केली. शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयाचे व्यवस्थापक मनोज वैद्य , महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रेसेस एम्प्लॉइज फेडरेशनचे अध्यक्ष मारुती शिंदे, बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख, शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे , माध्यमिक शिक्षक कर्मचारी संघटनेचे नाना पुंदे आणि शासन मुद्रण व लेखन सामग्री संचालनालयीन कर्मचारी संघटनेचे सचिव पालांडे यांनी दौंड यांच्या कार्याचा समग्र आढावा घेऊन गौरव केला.

कार्यक्रमात दौंड यांच्या समग्र कारकीर्दीचा आढावा असलेल्या “चैतन्य प्रकाश” या अविनाश दौंड गौरव ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच त्यांचा मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन तर सौ. ज्योती अविनाश दौंड यांचा सौभाग्य लेणे देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि मुंबईतील विविध खाते संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटना सरचिटणीस बाळकृष्ण तुरुंबाडकर, आभार प्रदर्शन अध्यक्ष संतोष डोके, संचलन कमलेश खानविलकर तर मानपत्राचे वाचन नंदकिशोर सोनावणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *