
| मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत चालल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अनेक नेते, कार्यकर्ते पक्ष बदलत वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. अशात मुंबई भाजपचे माजी सचिव समीर देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर देसाईंनी शिवबंधन हाती बांधले. समीर देसाई हे काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी खासदार गुरुदास कामत यांचे भाचे आहेत. बीएमसी निवडणुकांच्या तोंडावर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली असताना भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. समीर देसाई हे काँग्रेसकडून दोन वेळा नगरसेवक राहिले होते. त्यांनी मुंबई काँग्रेसचे प्रवक्तेपदही भूषवलं आहे. सलग दहा वर्ष समीर देसाई मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य होते.
काँग्रेसमधून त्यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता. भाजप नेते आशिष शेलार यांच्या उपस्थितीत देसाईंचा भाजपप्रवेश झाला होता. प्रवेशानंतर लगेचच त्यांना भाजपचं सचिवपद देण्यात आलं होतं. मात्र आता भाजपमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती आहे.
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!