“क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते ” म्हणत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी चर्चेदरम्यान संसदेत मानले कोरोना योद्धे यांचे आभार..!

| नवी दिल्ली | आज लोकसभेत, Bill for Consideration and Passing: The National Commission for Allied and Health Care Professionals, Bill 2021 या विधेयकावरील चर्चेमध्ये सहभाग घेत विविध विषयांवर भाष्य करत कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मत व्यक्त केले. तसेच विधेयकाचे समर्थन केले. यावेळी

जब टूटने लगे हौसले तो यह याद रखना
बिना मेहनत के हासिल तख्तो ताज नहीं होते
ढूंढ़ लेना अंधेरे में ही मंजिल अपनी
क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते

ह्या शेर वर टाळ्या घेत त्यांनी आपल्या विचारांतून फ्रंट लाईन वर्कर्स यांना सलाम केला. चर्चेदरम्यान कोरोना या वैश्विक महामारी विरोधी लढ्यात सर्वात पुढे राहून सक्रीय सहभाग असलेल्या फ्रंटलाईन वर्कर्स, कोविड योध्दा तसेच सर्व सलग्न आरोग्य कर्मचारी यांचे मनापासून कौतुक करत त्यांनी आभार व्यक्त केले. देशातील अलाइड आणि हेल्थ केअर प्रोफेशनल्स करिता नियमन करणे The National Commission for Allied and Health Care Professionals या नियामक मंडळामुळे सहज शक्य होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. तसेच यावेळी आरोग्य क्षेत्रातील काही बाबीं देखील सभागृहासमोर मांडल्या.

ठळक बाबी :

✓ देशातील आरोग्य क्षेत्रामध्ये २०१९ मध्ये केला गेलेला खर्च हा फक्त १.२८ टक्के असून देशाच्या आर्थिक सर्वेक्षण २०२०-२१ मध्ये देशांतर्गत आरोग्य क्षेत्रातील बजेट नुसार १८९ देशांमध्ये भारताचा १७९ वा क्रमांक आहे.

✓ देशातील लोकसंख्येच्या मनाने आपल्या येथे डॉक्टरांचे प्रमाण १:१४०४ असे असून १:१००० असे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने दर्शविले आहे. तसेच देशातील एकूण डॉक्टरांच्या ५२ टक्के डॉक्टर्स हे फक्त महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये आहे. इतर राज्यांमध्ये देखील हे प्रमाण वाढण्याची गरज आहे.

✓ सद्यकाळात आरोग्य क्षेत्रातील मनुळ्यबळ संख्या खुप कमी आहे. हेल्थ प्रोफेशनल्स यासारखे नवीन रोजगाराच्या संधी करिता प्रोत्साहन दिल्यास देशातील अनेक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल आणि आरोग्य क्षेत्रातील वाढीस मनुळ्यबळ निर्माण होईल.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3775568399206074&id=573455786084034

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *