भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी भर विधानसभेत या सेना नेत्याला म्हंटले ” तुम्ही सीएम मटेरियल आहात..”

| मुंबई | राज्यात विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली आहे. अधिवेशनात विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीये. मात्र आज अधिवेशनात झालेल्या एका वेगळ्याच गोष्टीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एक नवं वक्तव्य करुन राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना भर सभागृहात तुम्ही सीएम मटेरियल असल्याचं सांगितलं. सुधीर मुनगंटीवार यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

विधानसभेत भर सभागृहात भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे यांना उल्लेखून तुम्ही CM मेटेरियल आहात, असं विधान केलं, त्यामुळे मुनगंटीवारांच्या या विधानं केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वैधानिक विकास मंडळावरून सत्ताधारी आघाडी सरकार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी यवतमाळच्या आर्णी येथील गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून मुनगंटीवारांनी ठाकरे सरकारवर आरोप केले.

पंधरा महिने उलटले तरीही आरोप असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली नाही. सरकार अधिकाऱ्याला वाचवण्याचं प्रयत्न करतंय, अद्यापही निलंबनाची कारवाई झाली नाही, असा आरोप सुधीर मुनगंटीवारांनी केला. या आरोपाला उत्तर देताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार कोणालाही पाठिशी घालत नाही, चौकशी अहवालानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करू असं प्रत्युत्तर दिलं, त्यावरून मुनगंटीवारांनी तुमच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे, एखाद्या राज्यमंत्र्यांप्रमाणे वागू नका, असं म्हटल्याने सभेत सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.