मध्य रेल्वे :- मध्य रेल्वेच्या चाळीसगाव येथे तीन दिवस मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. 16 एप्रिल ते 16 एप्रिल असा तीन दिवसांच्या मेगाब्लॉकमुळं दहा प्रमुख रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, उत्तर महाराष्ट्रातील या सर्व ट्रेन आहेत. त्यामुळं प्रवाशांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चाळीसगाव स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगसाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालित करणार आहे
मध्य रेल्वेच्या प्रमुख मार्गावर चाळीसगावला तीन दिवस मेगाब्लॉक असल्याने काही ट्रेन रद्द होणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील या सर्व ट्रेन असून मुंबई बडनेरा चाळीसगाव धुळे भुसावळ देवळाली इगतपुरी अशा महत्त्वाच्या स्थानकांशी असलेला प्रवास थांबणार आहे. यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत रिझर्वेशन केलेल्या कुटुंबीयांची परवड होणार आहे.
रेल्वेमध्ये सध्या रिझर्वेशन एक एक महिना मिळत नसल्याने अधिक पैसे देऊन तत्काळ व प्रीमियम बुकिंग करावे लागतेय. आता ट्रेन रद्द झाल्याने ऐन दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती प्रवाशांची झाली आहे.
कोणत्या मेमू रेल्वे बंद राहणार?
११११३ देवलाली- भुसावळ मेमू ही १४ व १५ एप्रिलला रद्द राहील. ११११४ भुसावळ- देवलाली मेमू १४ व १५ एप्रिलला रद्द, १११२० भुसावळ- इगतपुरी मेमू १५ व १६ एप्रिलला रद्द राहील. ११११९ इगतपुरी- भुसावळ मेमू १६ व १७ एप्रिलला रद्द, ११०११ मुंबई- धुळे एक्स्प्रेस मेमू १४ ते १५ एप्रिलला रद्द राहील. ११०१२ धुळे-मुंबई एक्स्प्रेस मेमू १५ ते १६ एप्रिलला रद्द.
०१२११ बडनेरा- नाशिक मेमू १४ ते १६ एप्रिलला रद्द, १२१२ नाशिक- बडनेरा मेमू १४ ते १६ एप्रिलदरम्यान रद्द, ०१३०४ धुळे- चाळीसगाव मेमू १६ एप्रिलला रद्द राहील. मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांचे डायव्हर्शन जळगावहून सुरतमार्गे मुंबई करण्यात आले आहे.