चांगले काम करणाऱ्यांचा सत्कार केल्याने आणखी काम करण्याची उर्जा मिळते- आ.संजयमामा शिंदे ; राज्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल ग्रामविकास अधिकारी तात्यासाहेब पाटील यांचा सत्कार..

| महेश देशमुख (सोलापूर) | सोलापूर जिल्हा ग्रामसेवक संघाच्या वतीने जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत व ग्रामपंचायत या त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून राज्य स्तरावर नावलौकिक मिळवणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा तसेच यशवंत पंचायत राज अभियानात तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल पंचायत समिती कुर्डवाडीचे सभापती विक्रमसिंह शिंदे , उपसभापती धनाजी जवळगे, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील व राज्य ग्रामसेवक संघाच्या राज्याध्यक्ष पदी निवड तसेच राज्य आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पिंपळनेर ता. माढा येथील ग्रामविकास अधिकारी तात्यासाहेब रामदास पाटील यांचा सत्कार कुर्डूवाडीतील विठ्ठलराव शिंदे सभागृहात आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार विनायकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यावतीने सन्मान स्विकारला. 

यावेळी बोलताना आमदार संजयमामा शिंदे म्हणाले, सामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांना अशा सत्कार सोहळ्यातून आणखी चांगले काम करण्याची उर्जा मिळते. कर्मचारी व अधिकारी यांच्या समन्वयातून प्रशासकीय कामांना गती मिळते. कुर्डूवाडी पंचायत समिती स्तरावर पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी अतिशय उत्तमपणे काम करत आहेत. माजी उपसभापती तुकाराम ऊर्फ बंडूनाना ढवळे यांनी सापटणे टें गाव आता बदलत असून गावातून  तात्यासाहेब पाटील यांच्यासारखी राज्यस्तरावर विविध संघटनांचे नेतृत्व करणारी माणसे पुढे येत आहेत. तसेच उपळाई बुद्रुक गावानंतर सापटणे टें गावात अधिकाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे सांगितले. यावेळी सभापती विक्रमसिंह शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे, माजी आमदार विनायकराव पाटील, सभापती विक्रमसिंह शिंदे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांची भाषणे झाली. यावेळी उपसभापती धनाजी जवळगे, गटविकास डॉ. संताजी पाटील, पंचायत समिती सदस्य सुरेश बागल, सतीश पाटील, डॉ. शिवाजी थोरात, बालविकास प्रकल्प अधिकारी आनंद जाधव, बालाजी आल्लडवाड, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, उपअभियंता एस.जे नाईकवाडी, उद्योजक विठ्ठल ढवळे, कारखान्याचे संचालक पोपट चव्हाण,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, संभाजी ब्रिगेडचे नेते दिनेश जगदाळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार माढेकर यांनी तर आभार प्रदर्शन रामभाऊ मिटकल यांनी केले.

दोन्ही पाटीलांचे कौतुक”

यशवंत पंचायत राज अभियानात पुणे विभागात यावर्षी पंचायत समिती कुर्डवाडीने तृतीय क्रमांक पटकाविला यामुळे गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांचे सर्वंच उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात कौतुक केले. उपस्थितांमधून यावेळी ‘अधिकारी असावा तर असा’ हा सूर ऐकायला मिळाला.तर राज्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तात्यासाहेब पाटील यांच्या कामाचे कौतुक केले.त्यांनी काम केलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळाल्याचे बंडूनाना ढवळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *