चार चाकी गाडीत मास्क लावावा का.? केंद्राने हे दिले कोर्टात उत्तर..!

| नवी दिल्ली | ड्राव्हिंग करणाऱ्यांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. तुम्ही गाडी चालवत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. गाडीमध्ये तुम्ही एकटे असाल तर मास्क लावण्याची गरज नाही, असं केंद्र सरकारनं दिल्ली हायकोर्टात स्पष्टीकरण दिलं आहे.

कोरोना संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं मास्क वापरणं बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास दंड ठोठावला जातो. ड्रायव्हिंग करतानाही मास्क अनिवार्य आहे. पण एकट्यानं गाडीतून प्रवास करत असाल तर मास्क घालायलास हवा का? याबाबत केंद्र सरकारनं दिल्ली हायकोर्टात स्पष्टीकरण दिलं आहे.

गाडीत एकटं असताना मास्क लावणं बंधनकारक आहे, अशा कोणत्याही सूचना आम्ही जारी केलेल्या नाहीत. असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. कारमध्ये एकट्यानं प्रवास करत असाल तर मास्क लावणं अनिवार्य आहे.

दिल्लीत एकट्यानं ड्रायव्हिंग करताना मास्क न लावल्यास 2000 रुपये दंड आकारला जातो. बंद गाडीत ड्राइव्ह करतानाही असे चलान कापण्यात आले त्यामुळे दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. यावर कोर्टात सुनावणी झाली.

कोर्टानं दिल्ली पोलीस, दिल्ली सरकार आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला नोटीस जारी करत स्पष्टीकरण मागितलं. याबाबत केंद्र सरकारनं कोर्टात आपलं उत्तर दिलं आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (११ जानेवारी) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ऑनलाइन बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोरोना लसीकरणाचा फायनल प्लॅन ठरण्याची शक्यता आहे. भारतात दोन लशींना परवानगी देण्यात आली आहे. त्यापैकी कोव्हिशील्ड ही सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेली लस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे आणि त्याचेच डोस प्रथम देण्याचं ठरलं आहे. पहिल्यांदा कुणाला लस मिळणार, लसीकरणाची प्रक्रिया कशी असेल, राज्यांनी नेमकं काय करायचं याची चर्चा सोमवारच्या बैठकीत होईल.

११ जानेवारीला दुपारी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील. त्या त्या राज्यातली कोविड परिस्थिती, कोरोना रुग्णांची संख्या आणि त्यावर योजलेले उपाय यांची चर्चा होईल. तसंच कोरोना लसीकरणाची मोहीम कशी राबवायची याबाबतही आराखडा चर्चेत असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *