छत्रपती चे संचालक अनिल बागल यांच्यावर प्राणघातक हल्ला..

| भिगवण/ महादेव बंडगर | छत्रपती साखर कारखान्याचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरचे संचालक अनिल बागल यांच्यावर आज (दि.१मे) पिंपळे (ता. इंदापूर) येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये बागल यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांची बोटे तुटलेली आहेत. आज दुपारी अनिल बागल आपल्या सहकाऱ्यांसमवेत भिगवन-बारामती रोडवरील काम चालू असलेल्या स्वमालकीच्या पेट्रोल पंपावर सहकाऱ्यांसोबत चर्चा करत बसले होते.त्या ठिकाणी अचानक तीन हल्लेखोर आले आणि त्यांनी बागल यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. हल्ला चुकविण्याच्या प्रयत्नात त्यांची हाताची बोटे तुटलेली आहेत. बागल यांना या हल्ल्यात गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनीही भेट दिली. हल्लेखोर फरार झाले आहेत. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही अनिल बागल यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यावेळीही त्यांना गंभीर दुखापत झाली होती. भिगवण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *