गोविंदा दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवणार का? नागपुरात प्रचारासाठी आलेल्या अभिनेत्याचे मोठे वक्तव्य; मी मुख्यमंत्री शिंदेंकडून

नागपूर : शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अभिनेता गोविंदाने प्रचारात उडी घेतली आहे. त्याची सुरुवात ते रामटेक लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारातून करणार आहेत. याच क्रमाने अभिनेता शुक्रवारी नागपुरात पोहोचला. विमानतळावर शिवसेना कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी त्यांनी निवडणूक लढवण्यासह त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल चर्चा केली.गोविंदा म्हणाले, “आम्ही आजपासून निवडणूक प्रचाराला सुरुवात करत आहोत. आज रामटेकच्या सभेत सविस्तरात बोलू. ही फक्त एक सुरुवात आहे. यश तुमच्या कर्तुत्वावर अवलंबून आहे. त्यामुळे मी जे विचार मांडले आहे ते सत्यात उतरावे अशी प्रार्थना करतो. पुढे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त करत म्हणाले, त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे , आता आम्ही जे काही सुरू केले आहे ते जगभर गाजेल, असा आम्हाला विश्वास आहे. शिवसेनेचा प्रचार केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात पोहोचेल,” असे अभिनेते गोविंदा म्हणाले.

मी कोणतीही जागा मागितली नाहीलोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर गोविंदा म्हणाले, “मी निवडणूक लढवण्याबाबत आमच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. मी तिकीटही मागितलेले नाही. मात्र, शिवसेना शिंदे गट यांच्या सोबत आहे. या संधीसाठी धन्यवाद करतो. मी आतापर्यंत जे काही निश्चय केले आहे, ते पूर्ण झाले आहे. आता मी शिवसेनेच्या प्रचारासाठी आलो आहे. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार नक्कीच जिंकतील, असे मला वाटते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *