| नवी दिल्ली | कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (पीएफ) आता कर लागणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी १ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या अर्थसंकल्पात केली होती. याची अंमलबजावणी येत्या आर्थिक वर्षापासून अर्थात १ एप्रिलपासून सुरु होणार आहे. या नव्या नियमाचा तुमच्या पगारावर नक्की काय परिणाम होईल जाणून घ्या.
पीएफच्या या नव्या नियमानुसार, वार्षिक २.५ लाख रुपयांपर्यंतच्या पीएफसाठी कोणताही कर लागणार नाही. मात्र, या रकमेच्यावर कपात होणाऱ्या पीएफ रकमेवर कर लागणार आहे. परंतू हा कर नक्की किती असेल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. येत्या काळात याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
या कर्मचाऱ्यांना कर लागू नाही :
सध्याच्या कर तरतुदींनुसार, प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी आणि परफॉर्मन्स वेजेसमधून एकूण १२ टक्के रक्कम पीएफच्या रुपात कापणं बंधनकारक आहे.
तसेच यावर कुठलाही कर लागत नाही. मात्र, नव्या कर पद्धतीनुसार, उच्च उत्पन्न मिळवणार्यांना त्यांच्या पीएफ खात्यात अधिक योगदान देण्यापासून रोखण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना याचा फटका बसणार आहे.
सीतारामण अर्थसंकल्पावेळी काय म्हणाल्या?
या पगारदारांवरही होणार परिणाम :
उच्च उत्पन्न असणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त जे कर्मचाऱी ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी (व्हीपीएफ) मध्ये बंधनकारक असलेल्या पगारातील १२ टक्क्यांपेक्षा अधिक पैसे गुंतवतात त्यांना देखील या नव्या नियमाचा फटका बसणार आहे. कारण त्यांना अधिकच्या रकमेसाठी करसूट मिळणार नाही.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .