आता गृहिणींना ही मिळणार घरकामाच्या बदलात ‘ पेन्शन ‘, या पक्षाने जाहीरनाम्यात केली घोषणा..!

| मुंबई / तिरूअनंतपुरम | आई काय करते असे म्हटले तर वाद होतील किंवा तिच्या समर्थनासाठी अनेक मुद्दे समोर येतील. आता घरकाम करणाऱ्या आईसाठी खूशखबर आहे. घरकाम करण्याच्या मोबदल्यात मासिक पेन्शन मिळणार आहे. मात्र, ही खूशखबर केरळ निवडणुकीनंतर मिळेल, असे आश्वासन डावी लोकशाही आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे.

६ एप्रिल रोजी केरळ विधानसभेसाठी मतदान होणार आहे. येथे भाजप विरुद्ध डावी लोकशाही आघाडी असा सामना आहे. या निवडणुकीसाठी डावी लोकशाही आघाडीने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

यात गृहिणींना मासिक पेन्शन देण्याचे आश्वासन दिले आहे. तरुणांसाठी ४० लाख रोजगाराच्या संधी निर्माण करू, असे सांगितले आहे. माकपचे राज्य समिती सचिव के विजय राघवन, भाकपचे सचिव कन्नन राजेंद्रन आणि डाव्या लोकशाही आघाडीच्या इतर नेत्यांनी संयुक्तरित्या हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन हे राज्यात प्रचाराचा व्यस्त असल्याने ते या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.

येत्या पाच वर्षांत १५ हजार स्टार्टअपद्वारे एक लाख नागरिकांना नोकरी देऊ, असे आश्वासन देण्यात आले आहे तसेच खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांत १० हजार कोटी रुपये गुंतवणुक करू,असे आश्वासन दिले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ५० टक्के वाढ करू, असे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *