कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना भरीव आर्थिक मदत करत गोरख खटके-पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला वाढदिवस..!

| सोलापूर / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | कोरोनामुळे अनेक मुलांना अनाथ व्हावे लागले आहे. अशा अनाथ मुलांसाठी राज्य शासनाबरोबर समाजातील दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे येत आहेत. तांबवे टें ता. माढा जि. सोलापूर येथील रहिवासी व टेंभुर्णी ता. माढा येथील यश उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष गोरख खटके-पाटील यांनी ४ जुलै रोजी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुर्डूवाडी ता. माढा जि. सोलापूर येथील युवराज व पृथ्वीराज या अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी २१ हजार रूपयांची मदत केली व समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

कुर्डुवाडी ता. माढा येथील तानाजी नागटिळक व त्यांच्या पत्नी वैशाली नागटिळक यांचे १३ मे रोजी एकाच दिवशी कोरोनाने निधन झाले अन् त्यांचा बारावीत शिकत असलेला मुलगा युवराज व दहावीत शिकत असलेला पृथ्वीराज हे दोघेही अनाथ झाले.सध्या ते वयोवृद्ध आजी – आजोबांसोबत राहत आहेत. आई वडिलांचे छत्र हरपलेल्या या दोन गरीब अनाथ मुलांना पुढील शिक्षणासाठी यश उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष गोरख खटके-पाटील यांनी आपल्या वाढदिनी २१ हजार रुपयांची मदत केली व आपला वाढदिवस मित्रपरिवारासह आगळावेगळ्या पद्धतीने साजरा केला.त्यांच्या या आदर्शवत सामाजिक उपक्रमाचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तसेच डॉ.सुदाम कुंभार यांच्या शिवानी लाईफस्टाईल अकलूजच्या वतीने गोरख खटके-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नागटिळक कुटुंबीयांना कपडे देण्यात आले.

यावेळी यश उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष गोरख खटके-पाटील,सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष पवार, तांबवे टें तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष नागनाथ खटके-पाटील, कुर्डूवाडी न.प.चे माजी नगरसेवक बाबा गवळी , छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष नानासाहेब ढवळे, टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य औदुंबर महाडिक, कन्हेरगांव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे, अभियंता धनंजय ढवळे, मराठा सेवा संघाचे माढा तालुका अध्यक्ष निलेश देशमुख, विनायक पाटील, राष्ट्रवादीचे तालुका प्रसिद्धीप्रमुख सतीश काळे, बबनराव भोसले, सोमनाथ नाळे, अतुल सरडे,विलास लोकरे, डॉ . संजय दुपडे, संजय गमे-पाटील, महेश देशमुख, डॉ.सुदाम कुंभार, मच्छिंद्र कांबळे, मराठा सेवा संघाचे कुर्डूवाडी शहराध्यक्ष सचिन महिंगडे, बाबाफरीद पठाण आदी उपस्थित होते .
____________________________

मुलांच्या भवितव्यासाठी मदतीची गरज :

कोरोनाने आई वडीलांचे छत्र हरपलेले युवराज व पृथ्वीराज अनुक्रमे बारावी व दहावीत शिकत शिकत असून त्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी मदत केल्यास नक्कीच ते स्वतः पायावर उभे राहतील व आमच्या माघारी आमच्या कुटुंबाला स्थैर्य मिळेल असा विश्वास तानाजी नागटिळक यांचे वडील नारायण व आई जनाबाई यांनी व्यक्त केला. यावेळी गोरख खटके-पाटील यांनी समाजातील दानशूर व्यक्तींनी या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.

भरती पुर्व पोलीस प्रशिक्षणासाठी संतोष पवार करणार मदत :

स्व. तानाजी नागटिळक यांचे आपल्या मुलाला पोलीस करण्याचे स्वप्न होते हे त्यांच्या वडिलांनी यावेळी सांगितले. तद्नंतर सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी युवराज तानाजी नागटिळक याला बारावीनंतर पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण केंद्रात दाखल करून सर्व आर्थिक मदत करू असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *