
| ठाणे | सध्या महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दिवसागणिक झपाट्याने कोरोना रुग्ण वाढत आहेत. तर त्याच्याच दुसऱ्या बाजूला दिवसाला ४ लाख किंबहुना त्याहून अधिक नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. सध्या ४५ वर्षापुढील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर पत्रकारांचे प्राधान्यक्रमाने लसीकरण करणे तसेच कोरोनाने मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबांना राज्य शासनाकडून मदत मिळणे आवश्यक असल्याचे कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडले आहे.
यापूर्वी देखील मागील वर्षातील लॉक डाऊनच्या काळात पत्रकारांच्या आरोग्य शिबिरे यासह वेगवेगळ्या स्तरावरील समस्यांच्या बाबतीत मदतीला खासदार डॉ श्रीकांत शिंदे धावून गेले असल्याचे सर्वश्रुत आहेच. या पत्रातून त्यांनी केंद्र सरकारने पत्रकारांसाठी सुरू केलेल्या ५ लाख रुपयांच्या मदतीसारखी मदत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे घातले आहे.
काय आहे पत्रात :
कोरोनाचा प्रादुर्भाव पुनश्च: वाढत असून पत्रकार मात्र आजही आपले कर्तव्य बजावत आहेत.या पत्रकारांना प्राधान्याने लसीकरण सुविधा उपलब्ध करून द्यावी जेणे करून कोरोना विषाणूशी सामना करण्यची त्यांची क्षमता वाढेल, याबाबत आपण संबंधित विभागास आवश्यक त्या सुचना देवून सहकार्य करावे तसेच, कर्तव्य बजावत असताना आजमितीस कोरोनामुळे अनेक पत्रकारांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यातले बहुसंख्य पत्रकार ग्रामीण भागात पत्रकारीता करीत होते. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. देशभरातील असे पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबावर कोरोनामुळे ओढवलेली स्थिती पाहता मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकार तर्फे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याची योजना सुरू केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील ज्या पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला अशा पत्रकारांच्या कुटुंबियासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासनाने आर्थिक मदत योजना यथा शिघ्र सुरू करावी अशी नम्र विनंती..!
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!