कोरोना संबंधाने महत्वाची बातमी, आता कोरोना सेंटर मध्ये भरती होण्यासाठी कोरोना रिपोर्ट ची आवश्यकता नाही..!

| नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसताना दिसत आहे. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता कोरोना सेंटरमध्ये भरती होण्यासाठी कोरोनाचा रिपोर्ट अनिवार्य नसणार आहे.

कोरोनाची लक्षणं दिसून येतात, पण कोरोना रिपोर्ट न आल्यामुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल होता येत नाही. तसेच अनेकदा आरटीपीसीआर रिपोर्ट नेगेटिव्ह येतो, परंतु, सिटी स्कॅनमध्ये फुफ्फुसांमध्ये कोरोनाचा संसर्ग दिसून येतो, अशा रुग्णांना तत्काळ उपचार मिळण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

कोरोना रिपोर्टसाठी कोणत्याही रुग्णाची अडवणूक करता येणार नाही, असे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना तीन दिवसांच्या आत नवे निर्देश सहभागी करुन आवश्यक ते आदेश जारी करण्याचा सल्ला दिला आहे.

कोणत्याही रुग्णाकडे ओळख पत्र नाही म्हणून त्याला उपचार देणं टाळता येणार नाही. रुग्णालयात प्रवेश आवश्यकतेनुसार मिळणं गरजेचं आहे. ज्या रुग्णांना गरज आहे, त्यांनाच बेड उपलब्ध करुन देण्यात यावा, असंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *