वाचा : नगर जिल्हा बँकेवर हे झाले बिनविरोध, या दिग्गजांची माघार तर यांच्यात होणार लढत..!

| अहमदनगर | जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील पंचप्राण असणाऱ्या जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत अर्जमाघारीच्या अखेरच्या दिवशी काल मोठ्या राजकीय उलाढाली झाल्या. दिग्गजांनी आपापले गड शाबूत ठेवण्यासाठी इतरांचे अर्ज मागे घेतले जाण्यासाठी प्रयत्न केले.

अखेरच्या क्षणापर्यंत या घडामोडी सुरू होत्या. त्यातून 21पैकी 17 जागा बिनविरोध झाल्या, तर चार जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

बॅंकेच्या 21 जागांसाठी 198 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांतील 173 जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. आता चार जागांसाठी आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मोठी गर्दी होऊनही निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, तसेच त्यांच्या टीमच्या योग्य नियोजनामुळे अर्ज मागे घेण्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

हे आहेत बिनविरोध उमेदवार :

सेवा संस्था मतदारसंघ – अण्णासाहेब म्हस्के (राहाता) व चंद्रशेखर घुले (शेवगाव), मंत्री शंकरराव गडाख (नेवासे), विवेक कोल्हे (कोपरगाव), आमदार मोनिका राजळे (पाथर्डी), राहुल जगताप (श्रीगोंदे), अमोल राळेभात (जामखेड), सीताराम गायकर (अकोले), अरुण तनपुरे (राहुरी), माधवराव कानवडे (संगमनेर), भानुदास मुरकुटे (श्रीरामपूर), आमदार आशुतोष काळे (कोपरगाव).

महिला प्रतिनिधी मतदारसंघ :

अनुराधा नागवडे (श्रीगोंदे) व आशा काकासाहेब तापकीर (कर्जत).

शेतीपूरक, तसेच शेतीमाल प्रक्रिया व पणन संस्था मतदारसंघ – अमित अशोक भांगरे (अकोले).

विमुक्त जाती, भटक्‍या जमाती मतदारसंघ – गणपतराव सांगळे (संगमनेर).

इतर मागासवर्ग – करण जयंतराव ससाणे (श्रीरामपूर)

या दिग्गजांची माघार :

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार अरूण जगताप व संग्राम जगताप, माजी आमदार वैभव पिचड व पांडुरंग अभंग, सत्यजित कदम, सुभाष पाटील.

यांच्यात होईल लढत :

नगर तालुका सोसायटी मतदार संघ – शिवाजीराव कर्डिले, सत्यभामा बेरड, पारनेर – उदय शेळके विरूद्ध रामदास भोसले, बिगर शेती मतदारसंघ – दत्ता पानसरे विरूद्ध प्रशांत गायकवाड, कर्जत – अंबादास पिसाळविरूद्ध मीनाक्षी साळुंके.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *