दिल्लीच्या गादीसाठी चढाओढ, महाराष्ट्रात राजकीय गोंधळ, बाळूमामांच्या भंडारा यात्रेत भाकणूक

कोल्हापूर : राजधानी दिल्लीच्या गादीसाठी चढाओढ होईल, राजकारणात पैसे न खाणारा राजकीय नेता सापडणार नाही. राज्याच्या राजकारणात गोंधळ माजेल. सत्तेचे सिंहासन डळमळीत राहील अशी भाकणूक वाघापूर येथील कृष्णात ढोणे महाराज यांनी केले आहे.

 

 

 

कोल्हापूरसह राज्यातील आणि कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापुर येथील संत सद्गुरु बाळूमामांची भंडारा यात्रा सध्या सुरू आहे. यात्रेचा महत्त्वाचा भाग म्हणजे भाकणूकीचा दिवस. याकडे लाखो भाविकांचं लक्ष लागलेलं असत. भंडारा उत्सव जागर दिनी आज पहाटे वाघापूर येथील कृष्णा ढोणे महाराजांनी ही भाकणूक केली असून सत्तेचे सिंहासन डळमळीत राहील, अशी भाकणूकही त्यांनी केली आहे.

 

राजकीय नेते विकत मिळतील, पक्षनिष्ठा गहाण ठेवतील

आदमापुर ता. भुदरगड येथील सद्गुरु बाळूमामा भंडारा उत्सव शुक्रवारपासून सुरू झाला आहे, शुक्रवारी जागर आणि आज भाकणूक पार पडली, रविवारी सकाळी पालखी सोहळा आणि सायंकाळी चार वाजता महाप्रसादाचे आयोजन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आला आहे, तत्पूर्वी आज कृष्णात ढोणे महाराज, वाघापूर यांनी पहाटे भाकणूक कथन केली.

 

देश व राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजकारणी नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलांट उड्या मारतील. राजकारणी सत्ता संपत्तीच्या मागे लागतील. सत्तेच्या बाजारात राजकीय नेते विकत मिळतील, पक्षनिष्ठा गहाण ठेवतील, राजकारणात पैसे न खाणारा राजकीय नेता सापडणार नाही. राजकारणात छोटे पक्ष आघाडी घेतील. दिल्लीच्या गादीसाठी मोठी चढाओढ लागेल.

 

राज्याच्या राजकारणात गोंधळ होईल, सत्तेचे सिंहासन डळमळीत राहील. राजकारणात लोक देवा धर्माला विसरून जातील. भ्रष्टाचार उंदड होईल. नेतेमंडळी तुंरुगात जातील. जातीयवादी राजकारण सुरू होईल. जातीयवाचक राजकारण चालेल, अशी भविष्यवाणी बाळूमामा भंडारा उत्सव जागर दिनी कृष्णात डोणे वाघापूरकर यांनी केली. यावेळी लाखो भाविक उपस्थित होते.

 

१३८ किलो चांदीची मूर्ती अर्पण

राजस्थान आणि मध्य प्रदेश मधील धनगर बांधवांनी ५० लाख रुपये खर्च करून दिलेल्या रथामध्ये १३८ किलो चांदीची बाळूमामांची मूर्ती बसवण्यात आली आहे, बाळूमामा देवालयाची मानकरी कर्णसिंह धैर्यशीलराजे भोसले यांच्या हस्ते रथाची पूजा करून महाप्रसादाकरिता आणलेल्या मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी एकत्रित करून निढोरी आदमापुर मार्गावर रथोत्सव काढण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *