दिनेश जगदाळे दिल्लीत भारत ज्योती अवार्डने सन्मानित..!

| महेश देशमुख / सोलापूर | इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी, नवी दिल्ली या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून दिला जाणारा मानाचा भारत ज्योती अवार्ड सोलापूर जिल्ह्य़ातील माढा येथील दिनेश गोपीनाथ जगदाळे यांना राज्यसभा सदस्य शशिकला पुष्पा, सेक्रेटरी जनरल गुरूप्रित सिंग यांच्या हस्ते दिल्लीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातून ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम यांच्यासह दिनेश जगदाळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आर्थिक, सामाजिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक, साहित्य, संशोधन आणि राजकारण या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा दरवर्षी या अवार्डने सन्मान करण्यात येतो. जगदाळे यांनी पोलीस सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली असून त्यांनी पोलिस सेवेत असताना केलेले कार्य व स्वेच्छानिवृत्ती नंतर रोटरी क्लब व संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी या संस्थेकडून नवी दिल्लीत आयोजित आर्थिक वाढ आणि राष्ट्रीय एकात्मता यावर चर्चासत्रात त्यांना राष्ट्रीय पातळीवरील भारत ज्योती अवार्ड हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी त्यांच्या समवेत पत्नी लता जगदाळे,मुलगा शिवराज जगदाळे व डॉ. सुभाष पाटील, डॉ.सोमेश्वर टोंगळे, दिलीप चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, भारत लटके, रूपाली लटके, लता चव्हाण, संगिता चव्हाण, विजया मस्के उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल दीनेश जगदाळे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *