ग्रामीण भागातील प्रबोधनकार डॉ. दिलीप धानके यांचे निधन.!

| ठाणे | शहापूर तालुक्यातील कवी, वक्ता, लेखक, साहित्यिक ज्येष्ठ मार्गदर्शक, शिवधर्म संचालक, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे मार्गदर्शक, विविध प्रकारच्या पुरोगामी चळवळींचा मोठा आधार, कोंकण परिसरात मराठा सेवा संघाचे काम रुजवण्यासाठी प्राथमिक समुपदेशन करणारे, गेले चार वर्षांपासून माहुली गड शहापूर येथील शहाजीराजे जन्मोत्सव सोहळा साजरा करणारे साप्ताहिक शिवधर्म ठाणे संस्थापक सदस्य, प्रसिद्ध प्रबोधनकार व शिवाचार्य डॉ. दिलीप धानके यांचे शुक्रवारी ठाणे येथे निधन झाले.

डॉ. दिलीप धानके यांना दहा दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी १९९८ पासून कोकणात व विशेषतः ठाणे, कल्याण, मुरबाड, शहापूर, वाडा, पालघर तालुक्यांतील सर्व ग्रामीण आदिवासी भागात मराठा सेवा संघाचे काम व विचार पोहोचवण्याचे काम केले होते. सामूहिक विवाह आयोजन, आरोग्य तपासणी शिबीर, प्रबोधन कार्यक्रम, विविध कार्यशाळा, प्रवचन व व्याख्यान या माध्यमातून समाजप्रबोधन केले. मराठा सेवा संघ, अखिल भारतीय मराठा सेवा संघ, जनक्रांती या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी काम केले. अनेक पुस्तकाचे लिखाण त्यांनी केले. विविध कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले. अनेक तरुण त्यांनी घडवले. केडर कॅम्प त्यांनी घेतले. शहापूर तालुक्यासह ठाणे जिल्ह्यात त्यांची ख्याती होती. शासकीय सेवेत असतानाही त्यांनी अनेक शासकीय उपक्रम हाती घेऊन शासकीय स्तरावर काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *