डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षच्या माध्यमातून अंध व अपंग व्यक्तींना मोफत कृत्रिम पाय उपलब्ध..!

| पुणे | नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पश्चिम महाराष्ट्रच्या माध्यमातून पुणे येथील वीर धरण या अतिशय दुर्गम भागातील कु.चंद्रकला कुडाळकर व श्री तुकाराम जाधव या अंध व अपंग रुग्णना मोफत कृत्रिम पाय उपलब्ध करून दिले आहेत. तसेच माणुसकीचे दूत व्यासपीठच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबाला धान्य किट देण्यात आले.

शिवसेना शहरप्रमुख श्री गजानन थरकुडे, पुणे येथील डॉ सस्ते, माणुसकीचे दूत व्यासपीठचे सारंग सराफ सर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे या सर्वांचे या चांगल्या कामासाठी मोलाचे सहकार्य या साठी लाभले. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पश्चिम महाराष्ट्र संपर्क समनव्यक राजाभाऊ भिलारे यांनी सर्व सहकार्य करणाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *