धक्कादायक घडामोड : राज्याच्या राजकारणात मोठी धक्कादायक घडामोड घडणार आहे. एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजप मध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
एकनाथ खडसे पुन्हा भाजपवासी होणार अशा चर्चांना उधाण आले होते. त्यावर गिरीश महाजन आणि रक्षा खडसेंनी सूचक प्रतिक्रिया दिली होती. एकनाथ खडसेंचा संपर्क थेट वरच्या लोकांशी आहे, ते खालच्या लोकांशी संपर्क ठेवत नाहीत..त्यामुळे आपल्याकडे त्यांच्या प्रवेशाबद्दल माहिती नाही.. असा टोला गिरीश महाजनांनी लगावला. तर जोपर्यंत घटना घडत नाहीत तोपर्यंत त्यावर बोलून काहीच उपयोग नाही असं रक्षा खडसे म्हणाल्या.