| पारनेर | इंग्लडमधील काही विद्यार्थी मराठी भाषा अवगत करण्यासाठी प्रयत्नशील होते. यासाठी इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या शिक्षकांची तेथील पालकांना गरज होती. त्यासाठी इंग्लडमधील त्या पालकांची मराठी शिकविणार्या शिक्षकाची शोध मोहीम सुरु होती . ब्रिटीश कोन्सिलद्वारे राज्यस्तरीय टॅग – को ऑडीनेटर प्रशिक्षण घेतलेल्या महाराष्ट्रातील शिक्षकांपैकी एका शिक्षकाचा शोध इंग्लडमधील मराठी शिकू पाहणाऱ्या मुलांसाठी त्यांच्या पालकांद्वारे चालु होता. हा शोध घेत असताना पारनेर तालुक्यातील चासकर वाडी येथे कार्यरत असणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका स्वाती झावरे शिंदे यांची निवड इंग्लडमधील पालकांनी केली आहे.
ऑनलाइन पद्धतीने रोज एक तास त्या इंग्लडमधील विद्यार्थ्यांना त्या शिकवणार आहे. ही बाब तालुक्याच्या दृष्टीने निश्चित गौरवाची आहे. इंग्रजी विषयाच्या त्या तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणुन तालुक्यातील शिक्षकांना इंग्रजीचे मार्गदर्शन त्या करत असतात. यासाठी त्यांचे पती राज्य स्तरावर इंग्रजी कमिटीवर कार्यरत असणारे रयत शिक्षण शाळा, अळकुटी येथील तज्ज्ञ इंग्रजी शिक्षक श्री.गोरक्ष शिंदे यांचे त्यांना वेळोवेळी मागदर्शन लाभत आहे. त्यांना घडविण्यामध्ये, प्रोत्साहन देण्यामध्ये त्यांचे खुप मोठे योगदान आहे. तसेच त्यांचे वडील माजी विस्तार अधिकारी मधुकर झावरे सर यांचाही त्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे.
अळकुटी येथील ग्रामीण भागातील रहिवासी जिल्हा परिषद शिक्षिका ग्लोबल टिचर होतेय याच अवघ्या महाराष्ट्राला कौतुक आहे. ज्या प्रमाणे माँ जिजाऊंनी बाल शिवाजी घडवुन महाराष्ट्रात क्रांती घडवुन आणली. अगदी व्हिएतनाम या छोट्याश्या देशाने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यामुळे अमेरिकेसारखे बलाढय राष्ट्र व्हिएतनाम ला नमवू शकले नाही. हा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊँ ही खरी तर ग्लोबल व्यक्तिमत्वे. माँ जिजाऊं महाराष्ट्राला नव्हे तर अवघ्या जगाला दिशा देणाऱ्या ग्लोबल टिचर होत्या असे म्हटले तरी त्यात वावगे ठरणार नाही . अश्याच महाराष्ट्रातील एका जिजाऊच्या लेकीला ग्लोबल टिचर होण्याचा मान मिळतोय ही निश्चितय पारनेर तालुक्यातील सर्वच शिक्षकांच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे.
१२ जानेवारी माँ जिजाऊँ यांची जयंती यानिमित्त प्रयासचे अध्यक्ष प्रसन्न पोपटराव पवार,प्रयासचे सदस्य प्रमोद झावरे, अळकुटी गावचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रख्यात जादुगार प्रकाशभाऊ शिरोळे, शिवभक्त शिक्षक परिषेदेचे प्रसिद्धी प्रमुख आदर्श शिक्षक बाळासाहेब रोहोकले पाटील यांनी जिजाऊँ जयंती च्या पार्श्वभुमीवर एकत्र येऊन ग्लोबल जिजाऊची लेक स्वाती झावरे शिंदे यांचा जिजाऊँ द टिचर ऑफ ऑल गुरुज हा ग्रंथ व शाल देऊन त्यांच्या घरी छोटेखानी कार्यकमात सन्मान केला व त्यांच्या भावी कार्यास माँ जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्यरत राहण्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना प्रमोद झावरे म्हटले की जिजाऊँच्या दुरदृष्टी ने महाराष्ट्र घडला .या मराठी संस्कृती चा परिचय करून द्यायची फार मोठी संधी तुम्हाला आंतराष्ट्रीय स्तरावर आहे . तर तुम्ही म – मराठी मातीचा , महाराष्ट्राचा, ज – जिजाऊँ माँ साहेबांचा , श – शिवाजींचा , छ – छत्रपतींचा , स – संभाजी महाराजांचा, र – रायगडचा अशी विद्यार्थांना अक्षर ओळख करून देऊन मराठी संस्कृती जगाला दाखवुन द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी वडनेर हायस्कुल चे श्री.सुभाष माने सर , अरिंजय रोहोकले ,सूरज माने, राणी माने , आदित्य रोहकले आदी उपस्थित होते.
यानिमित्त जि.प. सदस्या सुप्रियाताई झावरे पाटील (माई), आदर्शगाव हिवरेबाजारच्या राज्य स्तरीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका शोभाताई पोपटराव पवार, सौ. मंगल अंबादास झावरे, आदर्श शिक्षिका शैलजा पायमोडे, आदर्श शिक्षिका शारदा परांडे, ज्योती कर्डीले, रूपाली खिलारी, पुनम डेरे, डॉ. वृषाली आढाव, राजश्री दाते यांनी अभिनंदन केले आहे.