एवढे दिवस वापरावे लागेल मास्क; निती आयोगाच्या सदस्याने सांगितला ‘ इतका ‘ कालावधी..!

| नवी दिल्ली | जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीमुळे प्रशासनाने अनेक बंधन लादली आहेत. सोशल डिस्टन्सिंग राखणं, मास्क लावणं, अशा अनेक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.

मात्र आता लोक मास्क लावण्यासाठी टाळाटाळ करताना दिसत आहे. परंतू तरीसुद्धा आणखी काही काळ मास्क लावणं गरजेचं असल्याचं नीती आयोग सदस्य डाॅ. व्ही. के. पाॅल यांनी सांगितलं आहे.

पुढील काही काळ नाही तर पुढच्या वर्षापर्यंत मास्क घालणं गरजेचं असल्याचं डाॅ. पाॅल यांनी सांगितलं आहे. याबाबत बोलताना मास्क परिधान करणं आता बंद होणार नसून कोरोनाची तिसरी लाट नाकारता येणार नसल्याचंही पाॅल म्हणाले आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत तसेच मास्कबाबत भाष्य करत असताना कोरोनाचा लढा आता केवळ शिस्त, लस आणि प्रभावी औषधांद्वारे जिंकला जाऊ शकतो. पुढील तीन-चार महिने अत्यंत महत्त्वाचे असल्याचं पाॅल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, डाॅ. पाॅल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी उत्सावांमध्ये सुरक्षा कमी करण्याबाबत सावधगिरी बाळगण्यात यावी नाहीतर संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरु शकतो. कोरोनाची दुसरी लाट सध्या देशभर पसरत आहे. जर व्यवस्थितपणे काळजी घेतली तर तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल, असं सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *