गारगुंडीत ७-० च होणार, साईकृपा ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा फुटला नारळ..!

| पारनेर | सध्या संबंध महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जवळपास १४ हजाराहून अधिक ग्रामपंचायत निवडणूका राज्यात पार पडत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात देखील आठशेच्या आसपास ग्रामपंचायती आपले कारभारी ठरवणार आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असल्याने आता गावोगावी सक्रिय प्रचार सुरू झाला आहे. गारगुंडी गावात देखील साईकृपा ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराचा आज जिल्हा परिषद सदस्या व आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांच्या हस्ते नारळ फुटला. यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे बाळासाहेब ठुबे, माजी सरपंच बी डी झावरे सर, माजी सरपंच निवृत्ती झावरे, माजी सरपंच अंकुश झावरे, माजी सरपंच बाळकृष्ण झावरे, चेअरमन सोपान झावरे अमीन भाई, गणी भाई शेख व उमेदवारांसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

गारगुंडी गाव सुशिक्षित गाव असल्याने इथला मतदार सुज्ञ आहे. त्यामुळे हा कोणत्याही अमिषाला बळी पडत नाही. यंदा देखील आपल्या पॅनलचा विजय ७-० असा दणक्यात होईल, असा विश्वास राणी ताई लंके यांनी व्यक्त केला. तसेच महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम गावात आपण लवकरच सुरू करू, असे देखील त्या म्हणाल्या. आमदार आपल्या घरातील आहे त्यामुळे कशाचीच अडचण येणार नाही. आपण बिनधास्त लढा. आपला ७ – ० ने विजय नक्की आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या सभेत बोलताना माजी सरपंच बी.डी. झावरे सर यांनी गारगुंडी गावाची निवडणूक बिनविरोध कशी झाली नाही, कोणी आणि कशी मुद्दाम अडवणूक केली हे सांगितले. आमदार निलेश लंके यांच्या सोबत झालेल्या दोनिही गटांच्या बैठकीत कोणी काय आडमुठेपणा दाखविला हे देखील त्यांनी या सभेत स्पष्ट सांगितले. निवडणुका आल्या की काही लोक उगवत असतात त्यांचे दर्शन तेवढ्याच काळात घडत असते, त्यामुळे गावातील सुज्ञ नागरिक त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, हे देखील यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.

साईकृपा पॅनल चा हनुमान मंदिरासमोर नारळ फोडून सुरू झालेला प्रचार मास्तरबाबा मंदिर, शेख वस्ती येथे मस्जिद मध्ये तसेच पीर बाबा यांना नारळ वाढवून पुढे सुरू झाला.

एकंदरीत, गारगुंडी गावात पुन्हा ७ – ० अशी निवडणूक होणार असल्याची भावना तिथे जमलेला प्रत्येक ग्रामस्थ बोलून दाखवत असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे आहेत साईकृपा ग्रामविकास पॅनलचे उमेदवार :

वॉर्ड क्रमांक १
श्री. तुकाराम मल्हारी फापाळे
सौ. सुमन सोपान झावरे
सौ. दयावती बबन झावरे

वॉर्ड क्रमांक २
श्री. विकास ज्ञानदेव झावरे
सौ. प्रमिला बाबाजी फापाळे

वॉर्ड क्रमांक ३
सौ. सुरेखा अप्पासाहेब ठूबे
श्री. प्रशांत काशिनाथ झावरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *