खुशखबर : आता What’sApp वरून करा लसीकरणाची नोंदणी..!

| नवी दिल्ली | केंद्र सरकारने WhatsApp वर आणखी एक सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. याआधी लोकांना कोविड लसीकरणाचे सर्टिफिकेट WhatsApp वरुन मिळवता येत होते. पण, आता नागरिकांना WhatsApp वर लसीकरणासाठी नोंदणीही करता येणार आहे. नागरिक MyGov च्या WhatsApp क्रमांकावर मेसेज पाठवून लसीकरणासाठी नोंदणी करु शकणार आहेत. अनेक भारतीय आता मोबाईलवर WhatsApp चा वापर करत आहेत. शिवाय WhatsApp वरुन लस घेण्यासाठी नोंदणी करणे अधिक सोपं जाणार आहे. (National Latest News)CoWin चा वापर करुन लोक सध्या लसीकरणासाठी नोंदणी करतात. पण, आता WhatsApp वरुनही त्यांना ही सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहे. CoWin पेक्षा WhatsApp वरुन लसीकरण नोंदणी अधिक सोपी जाणार असल्याचं बोललं जातंय.

What’s app वरून अशी करा नोंदणी..!

तुम्हाला WhatsApp वरुन लसीकरणासाठी नोंदणी करायची असेल तर खालील प्रोसेस फॉलो करा- तुमच्या कॉन्टॅक्ट यादीत MyGov corona helpdesk क्रमांक 9013151515 असायला हवा- क्रमांक सेव्ह केल्यानंतर यावर तुम्ही “Book Slot” असा मेसेज पाठवा- तुम्हाला SMS द्वारे सहा अंकी OTP क्रमांक पाठवला जाईल. तो क्रमांक याठिकाणी चॅटमध्ये टाका- तुमच्या मोबाईल क्रमांकावर नोंद असलेल्या सदस्यांची यादी तुम्हाला दिसेल- तुम्ही 1,2,3 पर्यायांपैकी एक निवडू शकता-चॅटमध्ये तुम्ही पीन कोड टाका, त्यानंतर WhatsApp तुम्हाला परिसरातील लसीकरण केंद्राची यादी दाखवेल- तुमची अपॉईंटमेंट निश्चित करा आणि दिलेल्या तारखेला लसीकरण केंद्राला भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *