सरकारी कार्यालयात जीन्स चालेल ! टी – शर्ट नाहीच, शासनाचे शुद्धिपत्रक आले…

| मुंबई / विनायक शिंदे | शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी, अधिकारी यांनी टी शर्ट व जीन्स पॅंटचा वापर करु नये असा आदेश मागे घेत जीन्स पँट चालेल पण टी शर्ट मात्र चालणार नाही असे शुद्धीपत्रक शासनाने आज काढले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ८ डिसेंबर २०२० रोजी शासन निर्णय निर्गमित करीत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या नियमित तसेच कंत्राटी स्वरूपातील अधिकारी, कर्मचारी, सल्लागार यांच्यासाठी कार्यालयात परिधान करावयाच्या पोशाखा संदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. या सूचनांद्वारे जीन्स पॅन्ट व टी शर्ट घालता येणार नाही असे बजावले होते.

या शासन निर्णयांसंबधी राज्यात विविध प्रतिक्रिया निर्माण झाल्या होत्या, काही ठिकाणी स्वागत झाले तर काहींनी या निर्णयाची खिल्ली उडवली. दरम्यान आज १६ मार्च २०२१ रोजी सामान्य प्रशासनाने शुद्धीपत्रक काढत जीन्स पँट चालेल टी शर्ट चालणार नाही असे सूचित केले आहे.

या निर्णयाने कार्यालयांमधील कार्यक्षमता किती वाढते व जनसामान्यांच्या प्रश्नांना, अडचणीना मार्ग निघेल हे बघावे लागेल..

Leave a Reply

Your email address will not be published.