सरकारी कर्मचाऱ्यांच्या फोन वर प्रतिबंध, ही अशी आहे नियमावली..!

| मुंबई | सरकारी कार्यालयांमध्ये शासकीय कामकाज करताना मोबाईल फोनचा वापर करण्याबाबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन वापराबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. भ्रमणध्वनीवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. तसेच बोलताना इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवावी, यासह 10 महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारतर्फे हे परिपत्रक काढण्यात आले आहे.

शासकीय कामकाज मोबाईल फोन वापराबाबत महत्त्वाच्या सूचना कोणत्या :

1. कार्यालयीन कामासाठी दूरध्वनीचा वापर करताना प्राधान्याने कार्यालयातील दूरध्वनीचा (Landline) वापर करावा.

2. कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामासाठी आवश्यक असेल तेव्हाच भ्रमणध्वनीचा वापर करावा.

3. भ्रमणध्वनीवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. तसेच बोलताना इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवावी.

4. भ्रमणध्वनीवर बोलताना सौम्य आवाजात बोलावे, बोलताना वाद घालू नये तसेच असंसदीय भाषेचा वापर करू नये.

5. कार्यालयीन कामासाठी भ्रमणध्वनीचा वापर करताना लघु संदेशाचा (Text Message) शक्यतो वापर करावा.

6. मोबाईल फोनवर बोलताना कमीत कमी वेळेत संवाद साधावा
भ्रमणध्वनी व्यस्त असताना प्राप्त लोकप्रतिनिधी / वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कॉल्सना तात्काळ उत्तर द्यावे
भ्रमणध्वनीवर कार्यालयीन कामकाजासाठी समाज माध्यमाांचा वापर करताना वेळेचे आणि भाषेचे तारतम्य बाळगावे.

7. अत्यावश्यक वैयक्तिक दूरध्वनी हे कक्षाच्या बाहेर जाऊन घ्यावेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात / बैठकी दरम्यान असताना आपला भ्रमणध्वनी सायलेंट किंवा व्हायब्रेट मोडवर ठेवावा.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ड्रेसकोड लागू केला होता. त्यानुसार सरकारी कार्यालयातून जीन्स आणि टी-शर्ट हद्दपार करण्यात आले. कामावर असताना कुठले आणि कसे कपडे घालावे, याबाबत महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक काढलं होतं.

काय आहेत सूचना?

1. गडद रंगाचे, चित्रविचित्र नक्षीकाम असलेले कपडे परिधान करु नयेत.

2. अधिकारी कर्मचाऱ्यांनी जीन्स टी-शर्टचा वापर कार्यालयात करु नये.

3. कर्मचारी, अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एकदा खादीचे कपडे घालावेत.

4. महिलांनी साडी, सलवार, कुर्ता, शर्ट आणि ट्राऊझर्स वापरावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *