खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघातर्फे ब्रिज कोर्स बाबत मार्गदर्शन

| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ शाखा जळगाव च्या वतीने महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नुकताच ब्रिज कोर्स बाबत ऑनलाइन मार्गदर्शन प्रशिक्षणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.

          या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे राज्य अध्यक्ष कां रा. तुंगार तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य सचिव प्रकाश देशपांडे ,उपाध्यक्ष अशोक मदाने , राज्याचे प्रवक्ते कृष्णा हिरेमठ , सुनिता लहाने, टि.के.पाटील आदी उपस्थित होते.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील यांनी, अतिथी परिचय व तांत्रिक सहाय्य राहुल चौधरी तर सूत्रसंचलन अजित चौधरी यांनी केले. यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती येथील विषय सहायक सुनिता लहाने यांनी जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना ब्रिज कोर्स बाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले. वर्षभरापासून शाळा बंद आहेत विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्ययावत करण्यासाठी शासनाने ब्रिज कोर्स केला आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यातील मुख्याध्यापकांनी करावी असे आव्हान सुनिता लहाने यांनी यावेळी केले. तसेच त्यांनी शिक्षकांच्या शंकांचे निरसन केले. तसेच महासंघाचे शिक्षक हितासोबतच विद्यार्थीहित जोपासणारी संघटना असल्याचे गौरवोद्गार काढले.

          यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कां. रा. तुंगार यांनी जिल्ह्यातील शिक्षकांना सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या व जिल्ह्यात संघटन वाढवावे असे आवाहन केले. तसेच यावेळी मुख्य सचिव प्रकाश देशपांडे उपाध्यक्ष अशोक मदाने राज्य प्रवक्ते कृष्णा हिरेमठ आदींनी मार्गदर्शन केले.

           यावेळी आभार जीवन महाजन यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संघटक राहुल चौधरी जिल्ह्याचे सचिव देवेंद्र चौधरी, कार्याध्यक्ष श्याम ठाकरे तसेच महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.